देवाडा येथे मनसेचा सरपंच तर थोराना येथे उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:33 AM2021-02-17T04:33:36+5:302021-02-17T04:33:36+5:30
चंद्रपूर : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामीण भागात मनसेने घवघवीत यश प्राप्त केले आहे. तर महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर मनसेचे ...
चंद्रपूर : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामीण भागात मनसेने घवघवीत यश प्राप्त केले आहे. तर महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर मनसेचे सदस्य निवडून आले आहे.
सोमवार रोजी झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व युवराज कुडे यांच्या नेतृत्वात २० वर्षे भाजपचा सरपंच असलेल्या देवाडा गटग्रामपंचायतमध्ये मनसेच्या उमा राजू लोनगाडगे निवडून आल्या तर गणपत कुडे यांच्या मार्गदर्शनात उपसरपंचपदी काँग्रेसचे विशाल रामटेके निवडून आले आहे.
तसेच थोराना कुचना गटग्रामपंचायतीवर मनसेचे मनोज तिखट, नागाळा (सी) गट ग्रामपंचायतीत प्रकाश शेंडे, विवेक धोटे, नितीन टेकाम, माया धोटे व पडोली ग्रामपंचायतीत निशिकांत पिसे, सुनीता पिंपळकर हे निवडून आले आहेत. येणाऱ्या काळात मनसे जोमाने लोकहिताचे व अभिनव कामे हातात घेणार अशी माहिती राहुल बालमवार यांनी दिली. निवडणूक जिकण्यासाठी प्रकाश नागरकर, कुलदीप चंदनखेडे, करण नायर, मयूर मदनकर यांनी मेहनत घेतली तर मनसे जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, किशोर मडगुलवार, मनोज तांबेकर, कृष्णा गुप्ता, बालू शेवते व महाराष्ट्र सैनिक यांनी गावातून रॅली काढत मतदारांचे आभार मानून विजयी उमेवारांचा सत्कार केला.