लाखापूरच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार

By राजेश भोजेकर | Published: August 12, 2023 05:44 PM2023-08-12T17:44:14+5:302023-08-12T17:47:34+5:30

चंद्रकला मेश्राम यांनी, जलजीवन मिशन योजनेमध्ये दिलेल्या योगदानाची दखल

Sarpanch of Lakhapur Chandrakala Meshram felicitated by PM Narendra Modi on Independence Day | लाखापूरच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार

लाखापूरच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार

googlenewsNext

चंद्रपूर :  केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जिल्ह्यातील "हर घर जल" योजनेअंतर्गत चांगले काम केलेल्या व्यक्तींना लाल किल्ला, दिल्ली येथे स्वातंत्र्यदिनी 15 ऑगष्ट रोजीच्या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापूर येथील सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा यात समावेश असून स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेश्राम यांचा सत्कार होणार आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत कामे सुरु आहेत. अनेक ठिकाणी कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली असून त्या गावात प्रत्येक घरी नळाद्वारे पाणी पोहचले आहे. जिल्ह्यातील अनेक गावे हर घर जल घोषित झालेली आहेत. अनेक ठिकाणी त्या गावातील सरपंच किंवा तेथील ग्रामपंचायत सदस्य समिती, स्वयं सहायता बचत गट यांनी  चांगले काम केले आहे. 

केंद्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापूर येथील सरपंच चंद्रकला मेश्राम यांनी, जलजीवन मिशन योजनेमध्ये दिलेल्या योगदानाची दखल घेतली आहे. 15 ऑगष्ट रोजी  दिल्ली येथे होणा-या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी सरपंच चंद्रकला मेश्राम व त्यांचे पती यांना उपस्थित राहण्याबाबतचे निमंत्रण केंद्र शासनाकडून देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) नुतन सावंत यांना महाराष्ट्र राज्याकडून या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी म्हणुन नियुक्त करण्यात आले आहे.

चंद्रकला मेश्राम यांच्या निवडीबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील महिला सरपंच यांचा देशाच्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावर सन्मान होणे, ही चंद्रपूर जिल्हयासाठी अभिमानाची बाब आहे. याच पावलावर पाऊल ठेवून इतरांनी प्रेरणा घ्यावी व गावाचा विकास साधावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.

Web Title: Sarpanch of Lakhapur Chandrakala Meshram felicitated by PM Narendra Modi on Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.