सरपंचाने वीज तंत्रज्ञासह तिघांना ग्रामपंचायतीत डांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:29 AM2021-03-27T04:29:25+5:302021-03-27T04:29:25+5:30
पाणीपुरवठा योजनेचे बिल थकीत असल्याने भरले की नाही, याची चौकशी करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ मंगेश सजारे व ...
पाणीपुरवठा योजनेचे बिल थकीत असल्याने भरले की नाही, याची चौकशी करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ मंगेश सजारे व सहकारी गौरव गौरकार, दिलीप गेडाम हे तीन कर्मचारी किटाळी बोर येथे ग्रामपंचायतीत गेले होते. दरम्यान, सरपंच छगन कोलते यांनी वरिष्ठ वीज अधिकारी ग्रामपंचायतीत आल्याशिवाय बिल भरणार नाही, अशी तंबी देऊन तिघांनाही दुपारी १.३० ते ३ वाजतापर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात डांबून कुलूप लावले. त्यानंतर, सरपंचानेच तळोधी येथील वीज वितरण केंद्राच्या सहायक अभियंत्याला या प्रकाराची मोबाइलद्वारे माहिती दिली. त्यामुळे सहायक अभियंता तातडीने नागभीड येथील वीज कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन किटाळीत दाखल झाले. कायदा हातात घेणे योग्य नसल्याचे सांगितल्यानंतर सरपंचाने कुलूप उघडून तिघांचीही सुटका झाली. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या तक्रारीवरून सरपंच कोलते यांच्याविरुद्ध नागभीड पोलिसांनी भादंवी १८६, ३४२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.