सरपंचांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:27 AM2021-03-21T04:27:10+5:302021-03-21T04:27:10+5:30

फोटो : कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ॲड. बाबासाहेब वासाडे मूल : शासनाच्या योजनांचा गावातील पात्र व्यक्तींना लाभ मिळाला पाहिजे. भविष्याचा ...

Sarpanch should contribute for the overall development of the village | सरपंचांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे

सरपंचांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे

Next

फोटो : कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ॲड. बाबासाहेब वासाडे

मूल : शासनाच्या योजनांचा गावातील पात्र व्यक्तींना लाभ मिळाला पाहिजे. भविष्याचा वेध घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तम नियोजन आणि अंमलबजावणी करा. सरपंच, उपसरपंचांना प्रशिक्षणातून अधिक सक्षम झाल्यानंतर आपल्या गावाच्या विकासाचा लौकिक वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वासाडे यांनी केले.

मूल पंचायत समिती आणि पंचायत राज प्रशिक्षण केंद्रांनी संयुक्तपणे तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांची तीनदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सभापती चंदू मारगोनवार यांनी उपस्थित नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांनी पाच वर्षांत गावात केलेल्या विकास कामातून तालुक्याचा लौकिक वाढविण्यासाठी आवश्यक प्रयत्न आणि त्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वासाडे, सचिव ॲड. अनिल वैरागडे यांच्याहस्ते करण्यात आले.

कार्यशाळेत ग्रामपंचायत सभा कामकाज, कामे, अधिकार, कर्तव्य, जबाबदारी, समित्यांची स्थापना, नमुना १ ते ३३, ई-पंचायत, खरेदी प्रक्रिया, १५ वा वित्त आयोग अशा विविध विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले. यासाठी मुरुड (लातूर)चे पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य महेंद्र पांगळ, सातारच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव, प्राचार्य अविनाश गरपल्लीवार, निदेशक मारोती वराटकर, विनायक पाकमोडे, रवींद्र चुनारकर आदींनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

Web Title: Sarpanch should contribute for the overall development of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.