येल्लापूरच्या सरपंचाने थाटला समाज भवनात संसार
By admin | Published: March 10, 2017 02:00 AM2017-03-10T02:00:02+5:302017-03-10T02:00:02+5:30
गावातील समाज बांधवांना सामाजिक कार्यक्रम व इतर कार्य करण्यासाठी एकत्र बसण्याची सोय व्हावी,
सरपंचाची हुकूमशाही : चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
जिवती : गावातील समाज बांधवांना सामाजिक कार्यक्रम व इतर कार्य करण्यासाठी एकत्र बसण्याची सोय व्हावी, यासाठी शासनाने आमदार निधीतून येल्लापूर येथील गोंडगुडा येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करून दिले. मात्र त्या सभागृहाचा वापर सामाजिक कायार्साठी न होता खुद सरपंचानेच आपला आटाचक्की व संसार चालविण्यासाठी करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व संवर्ग विकास अधिकारी जिवती यांच्याकडे नागरिकांनी केली आहे.
जीवती तालुक्यातील येल्लापूर ग्रामपंचायतीमध्ये चार गावे येत असून येथील लोकसंख्या १ हजार २५४ तर कुटुंब संख्या ४१८ आहे. गावात नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक सभागृहाची गरज नेहमीच पडत असते. परंतु सभागृह असूनही समाज कायार्साठी उपयोगी पडत नाही. गेल्या कित्येक वषार्पासून येथील सरपंच माधव कान्हु पेंदोर यांनी आपली हुकुमशाही दाखवित समाज भवनात अटाचक्की लावून संसार थाटल्याचा प्रकार गावकऱ्यांनी उजेडात आणला आहे.
याबाबत नागरिकांनी जिवतीचे संवर्ग विकास अधिकारी व ग्रामसेवक यांना लेखी तक्रारी दिल्या होत्या. मात्र त्याकडे कोणीही लक्ष न दिल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. एकीकडे सरपंच म्हणजे गावचा पुढारी समजला जातो. त्यांच्या देखरेखीखाली गावातील संपुर्ण विकास कामे राबविताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे मात्र आपली हुकुमशाही दाखवून समाज भवनात संसार थाटतो अन् संबंधित विभाग याकडे कानाडोळा करतो, याला काय म्हणावे?
सन १९९२-९३ मध्ये येल्लापूर ग्रामपंचायतीमध्ये जलद सिंचाई विभागामार्फत तलावाचे काम पूर्ण करण्यात आले. त्याच तलावात अतिक्रमण करून माजी सरपंच सोनेराव पेंदोर यांनी विहिर खोदून शेतीसाठी पाणी वापरत असल्याने पाणी टंचाई जाणवत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सरपंच माधव कान्हु पेंदोर व माजी सरपंच सोनेराव पेंदोर हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. त्यांचा अनेक वर्षापासून या ग्रामपंचायतीवर ताबा आहे. त्यामुळे हुकुमशाही दाखवित असून चौकशी करून कारवाईची मागणी तक्ररारीतून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)