सीईओंच्या व्हिसीने वाढला सरपंचांचा आत्मविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 05:00 AM2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:34+5:30

द्रपूर जिल्ह्यात सध्यातरी एकही कोरोना रुग्ण नाही. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. असे असले तरी सर्तकता म्हणून प्रत्येक बारीकसारिक गोष्टींवर लक्ष दिल्या जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने गावातील आढावा घेण्यासाठी थेट सरपंचासोबत संवाद साधून माहिती जाणून घेतली.

Sarpanch's confidence boosted by CEO's VC | सीईओंच्या व्हिसीने वाढला सरपंचांचा आत्मविश्वास

सीईओंच्या व्हिसीने वाढला सरपंचांचा आत्मविश्वास

Next
ठळक मुद्देजाणून घेतली माहिती : कोरोनाला हरवायचे, घराबाहेर नाही पडायचे

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादूर्भाव जिल्ह्यात होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांपासून गावपातळीवरील सर्व कर्मचारीही कामाला लागले आहे. दरम्यान, कोरोनाविषयी गावातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल कर्डिले, उपमुख्य कार्यपालन अधिकारी निलेश काळे यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सरपंचासोबत संवाद साधला. या संवादामुळे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सरपंचाचा आत्मविश्वास वाढला असून गावपातळीवर ते अधिक जोमाने कामाला लागले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सध्यातरी एकही कोरोना रुग्ण नाही. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. असे असले तरी सर्तकता म्हणून प्रत्येक बारीकसारिक गोष्टींवर लक्ष दिल्या जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने गावातील आढावा घेण्यासाठी थेट सरपंचासोबत संवाद साधून माहिती जाणून घेतली.

सरपंचांनी दिली गावातील संपूर्ण माहिती
जिल्हा प्रशासनाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधल्यामुळे गावागावांतील सरपंचाचा आत्मविश्वास वाढला असून त्यांनीही कोरोनासंदर्भात गावातील परिस्थितीची अधिकाऱ्यांजवळ संपूर्ण माहिती कथन केली. प्रशासकीय यंत्रणांसोबत आपणही त्याच जोमाने काम करणार असून कोणत्याही परिस्थितीत कोरोनावर मात करू, असा विश्वासही सरपंचानी यावेळी व्यक्त केला.

या प्रश्नांची जाणून घेतली माहिती
गावामध्ये स्वच्छता केली काय, फवारणी सुरु आहे का, ग्राम पंचायत स्तरावर समिती स्थापन केली काय, बाहेर गावावरून आलेले विलगीकरणात राहतात काय, प्रचार प्रसिद्ध कोणत्या प्रकारे केली आहे. साबण वाटप केले काय, हात धुण्याचे महत्त्व पटवून दिले काय, गावात पुरेसा टीसीएल साठा आहे काय, गावामध्ये असंघटीत मजुर आहे का, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू पुरवठादारांची यादी प्रसिद्ध केली काय, जीवनावश्यक वस्तू पुरवठा करताना दोन ग्राहकांमध्ये अंतर ठेवल्या जाते काय.

नियंत्रण कक्षातून १० हजारांवर नागरिकांसोबत संवाद
कोवीड- कोरोनाला हरवायचे, घराबाहेर नाही पडायचे या अंतर्गत मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेअंतर्गत जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षातून १० हजारांच्यावर नागरिकांसोबत संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. येवढेच नाही तर कोरोनासंदर्भात आवश्यक ती माहिती देण्यात आली. यामुळे नागरिकांचा गैरसमजही दूर केला जात आहे.

कोरोनाविषयक गावातील प्रत्येक गोष्टींची माहिती घेण्यासाठी संवाद साधण्यात आला. सरपंचांनी यासंदर्भात सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. या संवादातून गावागावांत सुरु असलेल्या कामाची माहिती मिळाली.
- राहुल कर्डिले,
मुख्य कार्यपालन अधिकारी, चंद्रपूर

Web Title: Sarpanch's confidence boosted by CEO's VC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sarpanchसरपंच