एकाच वेळी विविध जाती-धर्मातील जोडप्यांनी बांधल्या साताजन्माच्या गाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 05:00 AM2022-05-22T05:00:00+5:302022-05-22T05:00:38+5:30

विविध धर्मांच्या उपवर-वधूंना त्यांच्या धर्माप्रमाणे विवाहाचा गणवेश, साडीचोळी देण्यात आली. बँडपथक, ढोलपथकासह त्यांना विवाह मंडपात आणण्यात आले. सुरुवातीला ख्रिश्चन समाजातील उपवर-वधूंचा विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर हिंदू, बौद्ध धर्म व मुस्लीम धर्मांतील उपवर, उपवधूंचा विवाह त्या-त्या धर्मगुरूंनी लावून दिला. या वेळी नवदाम्पत्यांचे नातेवाईक व हजारो चंद्रपूरकर या विवाह सोहळ्याचे साक्षीदार झाले. 

Satajanma knots tied by couples of different castes and religions at the same time | एकाच वेळी विविध जाती-धर्मातील जोडप्यांनी बांधल्या साताजन्माच्या गाठी

एकाच वेळी विविध जाती-धर्मातील जोडप्यांनी बांधल्या साताजन्माच्या गाठी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अपवाद वगळता प्रत्येकाचाच विवाह होतो. हा विवाह कसा करायचा हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असते. विवाहाच्या स्वरूपावरून तो गरीब की श्रीमंताचा हे ओळखता येते. अलीकडील काळात दोन वेळेची सोय कशी करावी याचा आधी विचार करावा लागतो. विवाहाचा खर्च अनेकांच्या आवाक्याबाहेरचा असताे. अशावेळी सामूहिक विवाह सोहळ्यांना विशेष महत्त्व प्राप्त होते. असाच एक  सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा माजी खासदार नरेश पुगलियांच्या पुढाकारातून दाताळा नवीन चंद्रपूर येथे श्री बालाजी मंदिर परिसरात मोठ्या दिमाखात पार पडला. आश्चर्य, या विवाह सोहळ्यात विदर्भातील तब्बल ३०५ विविध जाती-धर्मातील जोडप्यांनी एकाचवेळी साताजन्माच्या गाठी बांधल्या. चंद्रपुरात एकाच वेळी इतकी जोडपी विवाहबद्ध झाल्याची ही पहिली घटना आहे.
आझादी का अमृत महोत्सव व नरेश पुगलिया यांच्या पंचाहत्तरीनिमित्त आयोजित या सोहळ्याला निमंत्रित पाहुणे म्हणून नववर-वधूंना आशीर्वाद देण्यासाठी खासदार बाळू धानोरकर, लोकलेखा समिती प्रमुख माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार, वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, निर्दोष पुगलिया, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे, विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, ॲड. विजय मोगरे, माजी जि.प. अध्यक्ष वैशाली वासाडे, राष्ट्रवादीचे दीपक जयस्वाल आदींसह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

वाजतगाजत निघाली वरात   
विविध धर्मांच्या उपवर-वधूंना त्यांच्या धर्माप्रमाणे विवाहाचा गणवेश, साडीचोळी देण्यात आली. बँडपथक, ढोलपथकासह त्यांना विवाह मंडपात आणण्यात आले. सुरुवातीला ख्रिश्चन समाजातील उपवर-वधूंचा विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर हिंदू, बौद्ध धर्म व मुस्लीम धर्मांतील उपवर, उपवधूंचा विवाह त्या-त्या धर्मगुरूंनी लावून दिला. या वेळी नवदाम्पत्यांचे नातेवाईक व हजारो चंद्रपूरकर या विवाह सोहळ्याचे साक्षीदार झाले. 

हजारोंनी घेतला छप्पन भोगचा आस्वाद
- नागरिकांसाठी ५६ प्रकारच्या स्वादिष्ट भोजनाची मेजवानी ठेवण्यात आली. 
- अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलेल्या विवाह सोहळ्याला मोठी गर्दी उसळली. 
- सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गायनासह कव्वालीचा कार्यक्रम सादर करून नागरिकांचे प्रबोधन केले. 

लोकोपयोगी उपक्रमांचा आज समारोप
कोरोना संकटाच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच चंद्रपुरात अशा आनंददायी सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे भाग्य या सोहळ्याच्या निमित्ताने चंद्रपूरकरांना लाभले. बालाजी मंदिरात १८ मेपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. रविवारी, २२ मे रोजी लोकाेपयोगी उपक्रमांचा समारोप होणार आहे.

 

 

Web Title: Satajanma knots tied by couples of different castes and religions at the same time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.