ओवाळा येथील मिरची सातरा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 11:06 PM2018-03-25T23:06:47+5:302018-03-25T23:06:47+5:30

येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ओवाळा येथील बसस्थानकांच्या बाजूला असलेल्या मिरची सातऱ्याला अचानक आग लागली. या आगीमुळे लाखो रुपयांची मिरची जळून खाक झाली.

Satra fire was burnt in the oven | ओवाळा येथील मिरची सातरा जळून खाक

ओवाळा येथील मिरची सातरा जळून खाक

Next
ठळक मुद्देलाखो रुपयांचे नुकसान : २५ ते ३० टन मिरची जळाली

आॅनलाईन लोकमत
तळोधी(बा.): येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या ओवाळा येथील बसस्थानकांच्या बाजूला असलेल्या मिरची सातऱ्याला अचानक आग लागली. या आगीमुळे लाखो रुपयांची मिरची जळून खाक झाली.
आज ओवाळा येथील बसस्थानकावर सकाळपासून या भागातील मजूर वर्ग मिरची मुक्या खुळण्यांचे कामे करीत होते. या भागात १५ ते १६ मिरची सातरे आहेत. गेल्या महिनाभरापासून ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध झालेले होते. या ठिकाणी आंध्रप्रदेशातून तेज नावांची मिरची येत होती. १० रु. किलो प्रमाणेमिरचीचे मुक्या खंळणेचे कामे केल्या जात होते. मुक्या खुळल्यांनतर येथील तेज नावाची मिरची मुंबई, कलकत्ता, विदेशात विक्रीसाठी नेली जात होती. ओवाळा येथील सदर मिरची सातरा नागपूर येथील अख्तरभाई यांचा होता. मिरची सातºया लागून स्वयंपाक गृह असल्यामुळे त्यांच्या आगीच्या टिंगणीमुळे मिरची सातºयातील २५ ते ३० टन जळून खाक झाली. मजुरांनी बाजूला असलेल्या बोरवेलच्या पाण्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात आली नाही. सदर मिरची साताºयाच्या आगीची माहिती तळोधी (बा.) पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत पांढरे यांना देण्यात आली. तञयांनी घटनास्थळाला भेट दिली व ब्रह्मपुरी येथील अग्निशामक दलाला फोन करण्यात आले. परंतुत्यांची गाडी नादुरुरस्त असल्यामुळे आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे संपूर्ण मिरची सातरा जळून खाक झाला. मात्र जिवीत हानी झालीन ाही. पुढील तपास तळोधी (बा.) पोलीसचे ठाणेदार करीत आहे.

Web Title: Satra fire was burnt in the oven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.