रामाळाच्या प्रदूषणमुक्तीसाठी बैठा सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:29 AM2021-02-16T04:29:27+5:302021-02-16T04:29:27+5:30
इको प्रोचे आयोजन : गोंडकालीन तलावाची झाली दुरवस्था चंद्रपूर : येथील गोंडकालीन ऐतिहासिक वारसा असलेला तलाव अतिक्रमणात गिळंकृत ...
इको प्रोचे आयोजन : गोंडकालीन तलावाची झाली दुरवस्था
चंद्रपूर : येथील गोंडकालीन ऐतिहासिक वारसा असलेला तलाव अतिक्रमणात गिळंकृत होत असून, प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासन कोणतीही कार्यवाही करीत नसल्याचा आरोप करीत रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करून तलावाचे खोलीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरी प्रदान करण्याच्या मागणीसाठी रामाळा तलावाच्या काठावर इको-प्रोने बैठा सत्याग्रह करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तोडगा न निघाल्यास २२ पासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
रामाळा तलाव खोलीकरणासोबतच मध्य रेल्वे विभाग, भारतीय पुरातत्त्व विभाग, महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, वेकोलीकडे सुद्धा मागण्या ठेवण्यात आलेल्या आहेत. बैठा सत्याग्रहामध्ये पर्यावरण व सामाजिक क्षेत्रातील मंडळी सहभागी झाले होते. यात निवृत्त वनाधिकारी अभय बडकेलवार, पर्यावरणवादी प्रा. सुरेश चोपणे, प्रा. योगेश दुधपचारे, श्रीपाद जोशी, उलगुलान संघटनेचे राजू झोडे, तुषार देशमुख, पर्यावरण वाहिनीचे शरीफ, विनायक साळवे, अमर गेही, आशिष अलचलवार, एम. आर. माडेकर, प्रा. किरण मनुरे, प्रा. सुभाष गिरडे, मजहर अली, मुकेश भांदककर, महेश अडगुरवार, भारती शिंदे, विशाखा टोंगे, योजना धोतरे, इको-प्रोचे नितीन बुरडकर, नितीन रामटेके, बिमल शहा, अब्दुल जावेद, संजय सब्बनवारांसह अनेक सदस्य सहभागी झाले होते.