युवक काँगेसचा भर पावसात बैठा सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:18 AM2021-07-09T04:18:33+5:302021-07-09T04:18:33+5:30
फोटो बल्लारपूर : पालिका प्रशासन आणि वेकोलीच्या सीमा वादात असलेला कॉलरी परिसर अनेक वर्षांपासून विकास कामांच्या प्रतीक्षेत आहे. असे ...
फोटो
बल्लारपूर : पालिका प्रशासन आणि वेकोलीच्या सीमा वादात असलेला कॉलरी परिसर अनेक वर्षांपासून विकास कामांच्या प्रतीक्षेत आहे. असे असताना नगरसेवकांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि पालिका प्रशासनाच्या नियोजन शून्यतेमुळे येथील समस्या ‘जैसे थे’ आहे.
आजवर युवक काँग्रेसने येथील रस्त्याच्या दुरुस्तीबाबत, वाॅर्डाच्या विकासाबाबत अनेक आंदोलने केली. मात्र, फक्त आश्वासनांचा मांडव टाकण्यात आला. त्यामुळे युवक काँग्रेसने भर पावसात रस्त्यावरील खड्ड्यातील पाण्यात बैठा सत्याग्रह करून वेकोली आणि नगर प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
जोपर्यंत रोडच्या दुरुस्तीला सुरुवात होत नाही. वाॅर्डातील विकास कामे होत नाहीत, तोपर्यंत लक्षवेधी आंदोलन सुरूच राहील, असा इशारा युवक काँग्रेसचे बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष चेतन गेडाम यांनी दिला आहे.
या आंदोलनात सुनील मोतीलाल, रूपेश रामटेके, दिलीप निमल, शशी कोटेवार, प्रशांत सग्गा, किष्णा नामस्वामी, श्रीकांत गुजरकर, संदीप नक्षिने, राजू सुखदेवे, देवेंद्र थापा, अमोल तुमसरे, प्रतीक घुगरूळकर, कमल केशकर, फईम शेख, गणेश पेरका, प्रज्वल पुरी उपस्थित होते.
080721\img-20210708-wa0007.jpg
अल्बम