सावरगाववासी घरकूलपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:00 AM2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:44+5:30
केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे घरकूल देण्यासाठी जिल्ह्याला लक्ष्यांक दिला आहे. सावरगव हे मोठे गाव असल्याने सदर योजनेतंर्गत लाभार्थ्यांची प्रपत्र ड यादी मागील वर्षी प्रसिद्ध झाली. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या अधिकृत जागेचा छायायाचित्रासह जिओ टॅग केला. मात्र अजूनपर्यंत घरकूल मंजूर केले नाही. त्यामुळे गरीब कुटुंबांना सदर योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील पात्र कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल देण्यासाठी गतवर्षीच प्रपत्र ड यादी प्रकाशित करण्यात आली. या यादीत विविध प्रवर्गातील २२३ कुटुंबांची नावे नमुद आहेत. त्यांच्या मालकीच्या जागेचा जीओ टॅगही झाला. मात्र, वर्ष लोटूनही अद्याप घरकूल न मिळाल्याने पात्र कुटुंबांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे घरकूल देण्यासाठी जिल्ह्याला लक्ष्यांक दिला आहे. सावरगव हे मोठे गाव असल्याने सदर योजनेतंर्गत लाभार्थ्यांची प्रपत्र ड यादी मागील वर्षी प्रसिद्ध झाली. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या अधिकृत जागेचा छायायाचित्रासह जिओ टॅग केला. मात्र अजूनपर्यंत घरकूल मंजूर केले नाही. त्यामुळे गरीब कुटुंबांना सदर योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. यंदाच्या पावसाळ्यात बºयाच कुटुंबांची घरे कोसळली. ही कुटुंबे घरकूल योजनेसाठी पात्र आहेत. परंतु, त्यांना पक्के घर नसल्याने मोडक्या घरातच वास्तव्य करावे लागत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लागू केलेल्या निकषात ही कुटुंबे येतात. बीपीएल यादीत नावे समाविष्ट असल्याने त्यांनी घरकूलसाठी अर्ज केला होता. तालुक्यातील अन्य गावांमध्ये प्रधानमंत्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने अनेकांना लाभ मिळाला. मात्र, सावरगाव येथे ही प्रक्रिया रखडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पंचायत समितीच्या संबंधित विभागाने योग्य पाठपुरावा न केल्याने सावरगावातील पात्र कुटुंबांवर अन्याय झाला. त्यामुळे अनेक कुटुंबे झोपडीत राहून दिवस ढकलत आहेत. काही भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहेत. अन्य पर्याय नसल्याने काहींनी पडक्या घरालाच आश्रय मानले आहे. पावसामुळे घराची पडझड झाल्याने एक कुटुंब समाज मंदिरात राहत आहे. बाबुराव शेंदरे यांच्या घराच्या दोन्ही भिंती खचल्या. पण घरकूल नसल्याने भिंतीला काठीचा आधार देऊन कुटुंबासह तिथेच वास्तव्य करीत असल्याचे दिसून येत आहे.
ओबीसी कुटुंबांना घरकूलची प्रतिक्षा
पिंपळगाव (भो) : ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो.) व परिसरातील गावांमध्ये ओबीसी प्रवर्गातील शेकडो कुटुंबे आहेत. पण, आर्थिकदृष्ट्या गरीब व दारिद्रयरेषेखालील येथील ओबीसी प्रवर्गातील कुटुंबांना शासनाकडून अद्याप घरकूल मिळाले नाही. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा, याकरिता शासनाने ओबीसी प्रवर्गाला काही जागा राखीव ठेवल्या. परंतु, पंचायत समितीने यासंदर्भात कार्यवाही न केल्याने वंचित राहावे लागत आहे. काही कुटुंबांचा उदरनिर्वाह केवळ मजुरीतूच सुरू आहे. घर बांधण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही. मुला-मुलींच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी या कुटुंबांची दमछाक होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ओबीसी प्रवर्गातील घरकूलचा प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांनी पंचायत समितीकडे केली.
परिस्थिती हलाखीची असल्याने घर बांधू शकलो नाही. अनेक वर्षांपासून अपूर्णावस्थेत असलेल्या पडक्या समाज मंदिरात कुटुंबासह राहत आहे. माझे नाव ड यादीत आले आहे. परंतु, अजूनपर्यंत घरकूल मिळाले नाही.
- रामदास पालकर, सावरगाव