पोषक आहार पुरविणारे बचत गट बेरोजगार होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:47 AM2017-08-30T00:47:44+5:302017-08-30T00:48:05+5:30
आयुक्त, एकात्मिक बाल विकास महिला सेवा योजनांतर्गत अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष मुलांना गरम ताजा पोषक आहार ......
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आयुक्त, एकात्मिक बाल विकास महिला सेवा योजनांतर्गत अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष मुलांना गरम ताजा पोषक आहार पुरविणाºया असंख्य महिला बचत गट बेरोजगारीच्या संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत.
२००५ वर्षापासून निरंतर अल्पदरात व उत्कृष्ठ शुद्ध व ताजे पोषक आहार अंगणवाडीतील मुलांना पुरविण्याचे कार्य महाराष्ट्र राज्यात स्थानिक कार्यक्षम महिला बचत गटाचे माध्यमातून सुरू आहे. या माध्यमातून असंख्य महिला बचत गट सक्षम होवून बेरोजगारीतून मुक्त झाले आहे. सर्व सुरळीत चालू असताना महाराष्ट्र शासनाने राज्य पातळीवर आयुक्त कार्यालय, नवी मुंबई यांनी पूर्वीच्या धोरणात आमुलाग्र बदल करून अत्यंत जाचक अटी व शर्ती लावून नवीन टेंडर काढले आहे. त्यामध्ये कोट्यवधीची मशीन लावण्याची अट, तीन वर्षाची अडीच कोटीची उलाढाल असणे बंधनकारक आहे. स्वत:ची प्रयोगशाळा अंदाजे ३० लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. हाताने शिजविलेले अन्न पोषक व दर्जेदार असते, तर मशिनरीचा वापर करून व चार महिन्यांपर्यंत वापरण्यास योग्य अन्न कधीच गुणवत्तेदार असू शकत नाही म्हणून हजारो महिला बचत गट कार्यकर्ता व लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आणणारा असा तुघलकी निर्णय त्वरित मागे द्यावा, अशी मागणी आहे.
या सर्व अटी सर्व साधारण महिला बचत गट पूर्ण करूच शकणार नाही, उलट या योजनेचे केंद्रीकरण होऊन विशिष्ठ व मर्यादित धानढ्य तसेच व्यावसायिक दृष्टीकोण ठेवणाºया गटांना सरळ लाभ होईल, असे झाल्यास असंख्य बचत गट महिला बेरोजगारीच्या खाईत लोटले जाणार आहे. त्यामुळे नवीन अटी व शर्तीचे टेंडर काढण्याची प्रक्रिया त्वरित थांबवून पोषक आहार पुरवठ्याचे काम हे स्थानिक कार्यरत बचत गटांना द्यावे, अशी मागणी केली.