‘त्या’ व्याजातून सावित्रीच्या लेकींना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 11:22 PM2018-09-03T23:22:39+5:302018-09-03T23:23:32+5:30

आर्थिकदृष्ट्या गरीब व निराधार कुटुंबातील इयत्ता एक ते पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीबाई फुले पालक दत्तक योजना सुरू करण्याचा निर्णय जि. प. शिक्षण समितीने सोमवारी पार पडलेल्या सभेत घेतला. विशेष म्हणजे ही योजना मागील पाच वर्षांपासून बंद होती. शिक्षकांनी आपल्या वेतनातून काही रक्कम जमा केल्यानंतर त्यातील व्याजातून ही योजना राबविण्यात येणार आहे.

Savitri's base from 'those' interest | ‘त्या’ व्याजातून सावित्रीच्या लेकींना आधार

‘त्या’ व्याजातून सावित्रीच्या लेकींना आधार

Next
ठळक मुद्देजि. प. शिक्षण समितीचा ठराव : शिष्यवृत्ती पात्र शाळेतील शिक्षकांचा होणार विशेष सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आर्थिकदृष्ट्या गरीब व निराधार कुटुंबातील इयत्ता एक ते पाचवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीबाई फुले पालक दत्तक योजना सुरू करण्याचा निर्णय जि. प. शिक्षण समितीने सोमवारी पार पडलेल्या सभेत घेतला. विशेष म्हणजे ही योजना मागील पाच वर्षांपासून बंद होती. शिक्षकांनी आपल्या वेतनातून काही रक्कम जमा केल्यानंतर त्यातील व्याजातून ही योजना राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे अध्यक्ष क्रिष्णा सहारे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक पार पडली. बनावट कागदपत्र सादर करून शासनाची दिशाभूल करणाºया ३२ शिक्षकांवर ही समिती काय कारवाई करते, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले होते. शिक्षण क्षेत्राला चालणा देणाºया विविध योजनांवर चर्चा करतानाच शिक्षक बदली प्रकरणावरही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला. जिल्हा परिषदने पाच वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले पालक दत्तक योजना सुरू केली होती. याकरिता शिक्षकांनी स्वत:च्या वेतनातून काही रक्कम जि. प. मध्ये जमा केली. जमा रकमेच्या व्याजातून एक ते पाचव्या वर्गातील गरीब व निराधार विद्यार्थिनींना रोख स्वरूपात प्रोत्साहनपर मदत दिल्या जात होते. मात्र ही योजना काही कारणास्तव बंद झाली. बैठकीमध्ये जि. प. सदस्य पृथ्वीराज अवथडे यांनी सदर बंद योजनेचा विषय मांडला. उपाध्यक्ष सहारे यांनी योजनेची उपयोगिता लक्षात घेऊन सकारात्मक भूमिका घेतली. अन्य सदस्यांनीही योजना सुरू करण्याची मागणी केली. परिणामी ठराव पारित करण्यात आला. जमा रकमेच्या व्याजातून पात्र विद्यार्थिनींना सुमारे १ हजार रूपये वार्षिक रोख रक्कम देण्यात येणार आहे. विद्यार्थिनीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही योजना अत्यंत परिणामकारक आहे. यापुढेही योजनेमध्ये सातत्य राहणार असून निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही जि. प. उपाध्यक्ष तथा समितीचे अध्यक्ष सहारे यांनी समितीच्या बैठकीत दिली. यावेळी जि. प. तथा शिक्षण समितीचे सदस्य पृथ्वीराज अवथडे, रंजीत सोयाम, रोशनी खान, रितू चौधरी, मेघा नलगे, योगिता डबले, कल्पना पेचे, गोपाल दडमल, तज्ज्ञ सदस्य जे. डी. पोटे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (निरंतर) निलेश पाटील व जिल्ह्यातील पंचायत समितींचे सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
विशेष सत्काराची अशी आहे अट
२०१७-१८ या शैक्षणिक सत्रात गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत जि. प. प्राथमिक शाळा भंगाराम (तळोधी) येथील इयत्ता पाचवीचे तब्बल ३२ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले. याशिवाय जि.प. शाळा विठ्ठलवाडा १८ आणि पारगाव जि. प. शाळेतील १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाच्या इतिहासात एकाच सत्रात ३२ विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची ही पहिलीच घटना आहे. शिक्षण समितीच्या सभेत हा विषय प्रामुख्याने चर्चेचा ठरला होता. दरम्यान इयत्ता ५ व ८ वीमध्ये एका शाळेतून पाच किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी पात्र झाल्यास त्या शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांचा शिक्षकदिनी विशेष सत्कार करण्याचा निर्णय जि. प. शिक्षण समितीने घेतला आहे.
पटसंख्या अधिक असणाऱ्या शाळांना मिळणार विज्ञानकीट
जिल्ह्यातील ५७१ जि. प. उच्च प्राथमिक शाळांपैकी ज्या शाळांनी विविध उपक्रम राबवून पटसंख्या टिकवून ठेवली. अशा शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञान साहित्याचे कीट देण्यात येणार आहे. याकरिता दहा लाखांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.
शिक्षकांसाठी हस्तपुस्तिकेची तयारी
जि. प. शाळेतील शिक्षकांना अध्यापन करणे सोयीचे व्हावे, याकरिता हस्तपुस्तिका तयार करण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला. ‘हस्तपुस्तिकेअभावी शिक्षकांमध्ये संभ्रम’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून जि. प. प्रशासनाचे लक्ष वेधले होते. प्रयोगशाळा, क्रीडा साहित्य खरेदी, संगणक कक्षाची देखभाल, दुरूस्ती, दरी खरेदी, पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा तसेच देखभालीसाठी कार्यवाही करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.
शालेय वाचनालयासाठी गं्रथखरेदी
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबतच विविध क्षेत्रातील ज्ञान व माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी, यासाठी वाचनालयांसाठी ग्रंथ खरेदी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या बदलत्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन ग्रंथांची निवड केली जाईल. ज्या शाळेतील संगणक धुळखात पडले. तेथील शिक्षकांनी संगणकाचा वापर अध्यापना करण्याचे निर्देशही देण्यात येणार आहे.

Web Title: Savitri's base from 'those' interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.