जलयुक्त शिवार अभियानातील बोडी खोलीकरण ठरले देखावा

By admin | Published: June 7, 2017 12:48 AM2017-06-07T00:48:31+5:302017-06-07T00:48:31+5:30

शासनाकडून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत शेततळे, बंधारे, बोड्या, मामा तलाव व नाले खोलीकरणाचे काम जोमाने सुरू आहेत.

Scenes of deepening the body of the Jalak Shikar Abhiyan | जलयुक्त शिवार अभियानातील बोडी खोलीकरण ठरले देखावा

जलयुक्त शिवार अभियानातील बोडी खोलीकरण ठरले देखावा

Next

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : नियमानुसार काम होत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : शासनाकडून जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत शेततळे, बंधारे, बोड्या, मामा तलाव व नाले खोलीकरणाचे काम जोमाने सुरू आहेत. परंतु, नियमानुसार व अंदाजपत्रकानुसार खोलीकरणाचे काम होत नसल्याने तसेच अधिकारी व कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या योजनेचा फ ज्जा उडत असल्याचे चित्र राजुरा तालुक्यात सुरू असलेल्या विविध कामाच्या स्थितीवरून दिसून येत आहे.
शासनाने शेतकऱ्यांच्या विकासात्मक बाबींचा विचार करून कृषी, लघु सिंचन, लघु पाटबंधारे, सामाजिक वनीकरण व वनविभागामार्फत कोट्यवधी रूपयांचा आराखडा तयार करून राजुरा उपविभागात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नाला खोलीकरण, बोडी खोलीकरण, शेततळे, बंधारे बांधकाम यासासारखे अनेक कामे सुरू केले आहेत. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून भुगर्भातील पाणी पातळी वाढून शेतीचे संरक्षित सिंचन करणे, वाहूण जाणाऱ्या पाण्याला अडविणे, सतत होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करणे व शेतकऱ्यांना संपन्न करण्याच्या उद्देशाने या योजनेची उपयुक्तता आहे. परंतु खोलीकरण कामाच्या अंदाजपत्रकानुसार अडीच ते साडेतीन मिटर खोदकाम करून तेथील माती इतरत्र टाकून खोली वाढविणे व पाळीची उंची वाढविणे असे असताना मात्र पैसा वाचविण्याच्या दृष्टीने फ क्त एक ते दीड मिटर खोदकाम करून अर्धवट सोडून दिले जात ओहत. त्यामुळे अनेक ठिाकणी सुरू असलेली जलयुक्त शिवार अभियानातील कामे ही फ क्त देखावाच ठरणार असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन चांगल्या दर्जाची कामे करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

खोलीकरणाच्या कामांची चौकशी करा- राजू डोहे
राजुरा तालुक्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील सिंधी, मुर्ती, नलफ डी, चिंचोली, अहेरी, वरूर रोड या परिसरात कामे सुरू आहेत. ही कामे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे गुणवत्ताहीन राहणार असून कंत्राटदार अंदाजपत्रकातील दिशानिर्देशांना केराची टोपली दाखवित तांत्रिक बाबींचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप राजुरा नगर परिषदेचे नगरसेवक राजु डोहे यांनी केला आहे. परिसरातील कामांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्राना पाठविलेल्या निवेदनाद्वारे डोहे यांनी केली आहे.

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत आमच्या शेतातील बोडी खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले. बोडीत खोदकाम करून माती पाळीवर टाकण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु, बोडीतील फ क्त गाळ जमा करून तो पाळीवर सरकविण्यात आला आहे. त्यामुळे खोलीकरण हे एक देखावाच ठरला आहे. याबाबत विचारणा केली असता खोदकाम करून माती टाकून देऊ, असे सांगितले. परंतु, अजूनही काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानातील कामे फ क्त देखाव्यापुरतीच असल्याचे दिसून येत आहे.
-मोरेश्वर थिपे, शेतकरी वरूर रोड

Web Title: Scenes of deepening the body of the Jalak Shikar Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.