अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी चंद्रपूरात व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:05+5:302021-06-23T04:19:05+5:30
माना समाज अजूनही मुख्य प्रवाहात आला नसून अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीसाठी वेळ ...
माना समाज अजूनही मुख्य प्रवाहात आला नसून अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीसाठी वेळ व पैसे खर्च करावा लागत आहे. त्यामुळे हे कार्यालय चंद्रपूर येथे सुरू करण्यात यावे, ही मागणी घेऊन पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात जाऊन निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी जि.प. सदस्य प्रा. डॉ. राजेश कांबळे, गटनेता विलास विखार उपस्थित होते. तसेच शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी नायब तहसीलदार धनश्री यादव यांनाही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी समाजाचे जांभुळे, राणे, हवनते, प्रा. वसंत घोडमारे, प्रा. विनय दडमल, नन्नावरे, घोडमारे व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
220621\img-20210621-wa0080.jpg
===Caption===
माना समाजाच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन देतांना