अनुसूचित जमातीच्या मुलांना शाळेमार्फत मिळणार जात व वैधता प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:52 AM2021-03-04T04:52:51+5:302021-03-04T04:52:51+5:30
: अनुसूचित जमातीच्या नववी व दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही शाळेच्या मुख्याध्यापकांकडून केली जाणार आहे. त्यांच्याच ...
: अनुसूचित जमातीच्या नववी व दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही शाळेच्या मुख्याध्यापकांकडून केली जाणार आहे. त्यांच्याच मार्फत जात वैधता प्रमाणपत्र तपासणीबाबतचे प्रस्ताव शाळेमार्फतच तपासणी समितीला सादर होणार आहे. यामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आदिवासी विकास विभागाचे शासन परिपत्रकानुसार सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना कार्यवाहीस्तव सूचना दिल्या होत्या. जि.प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती राजू गायकवाड यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना याबाबत अवगत करून कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना पाठविल्या आहेत. उच्चशिक्षण प्रवेश प्रक्रियावेळी होणारी तारांबळ थांबविण्यास या योजनेचा फायदा होणार आहे. पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे आवश्यक कागदपत्रे सादर करून आपल्या पाल्यांचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळवून घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते देवीदास जांभुळे यांनी केले आहे.