अनुसूचित जमातीच्या मुलांना शाळेमार्फत मिळणार जात व वैधता प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:53 AM2021-03-04T04:53:19+5:302021-03-04T04:53:19+5:30

: अनुसूचित जमातीच्या नववी व दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही शाळेच्या मुख्याध्यापकांकडून करून घेऊन त्यांच्याच ...

Scheduled Tribe children will get caste and validity certificate through school | अनुसूचित जमातीच्या मुलांना शाळेमार्फत मिळणार जात व वैधता प्रमाणपत्र

अनुसूचित जमातीच्या मुलांना शाळेमार्फत मिळणार जात व वैधता प्रमाणपत्र

Next

: अनुसूचित जमातीच्या नववी व दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही शाळेच्या मुख्याध्यापकांकडून करून घेऊन त्यांच्याच मार्फतीने जात वैधता प्रमाणपत्र तपासणीबाबतचे प्रस्ताव शाळेमार्फतच तपासणी समितीला सादर होणार असल्याने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

आदिवासी विकास विभागाच्या शासन परिपत्रकानुसार सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना कार्यवाहीस्तव कळविले होते .अर्थ व बांधकाम समितीचे सभापती राजू गायकवाड यांच्या पाठपुराव्यानंतर शिक्षणाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना याबाबत अवगत करून कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे.

उच्च शिक्षण प्रवेश प्रक्रियावेळी होणारी तारांबळ थांबविण्यास या योजनेचा फायदा होणार आहे. पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे आवश्यक कागदपत्रे सादर करून आपल्या पाल्यांचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळवून घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते देविदास जांभुळे यांनी केले आहे.

Web Title: Scheduled Tribe children will get caste and validity certificate through school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.