अखेर शिष्यवृत्ती परीक्षा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:29 AM2021-05-11T04:29:24+5:302021-05-11T04:29:24+5:30
कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून प्राथमिक शाळेचे वर्ग भरले नाही. दरम्यान, २७ जानेवारीपासून पाचवीपासून वर्ग भरले मात्र तेही काही दिवसातच ...
कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून प्राथमिक शाळेचे वर्ग भरले नाही. दरम्यान, २७ जानेवारीपासून पाचवीपासून वर्ग भरले मात्र तेही काही दिवसातच बंद पडले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने इयत्ता ५वी तसेच ८वीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे जाहीर करून तारीखही ठरविली. प्रादुर्भाव बघता ही परीक्षा रद्द करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार नागो गाणार यांनी केली होती. दरम्यान, परीक्षा घेतली आणि एखाद्या विद्यार्थी, शिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची वाट बघू नये, असा इशारा दिला होता. त्यानंतर शिक्षण विभागाने १० मेला पत्र काढून संबंधित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे पत्र काढले आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे.