शिष्यवृत्ती परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:27 AM2021-04-13T04:27:00+5:302021-04-13T04:27:00+5:30

बॉक्स पालक काय म्हणतात. मागील वर्षभरापासून शाळा बंद आहेत. ऑनलाईन कसे तरी शिक्षण सुरु होते. आता परीक्षा रद्द करण्यात ...

Scholarship exams can happen, so why not school | शिष्यवृत्ती परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही

शिष्यवृत्ती परीक्षा होऊ शकते, मग शाळेची का नाही

Next

बॉक्स

पालक काय म्हणतात.

मागील वर्षभरापासून शाळा बंद आहेत. ऑनलाईन कसे तरी शिक्षण सुरु होते. आता परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होणार, असा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना पुढील वर्षात ढकलणे धोकादायक आहे.

- संतोष वडे, पालक

------

कोणत्याही विद्यार्थ्याला नापास करु नये, असे शासनाचे धोरण आहे. आता महामारी असताना परीक्षा न घेणे विद्यार्थी हिताचे आहे. परीक्षेपेक्षा मुलांचा जीव महत्त्वाचा आहे. परिस्थिती निवळल्यानंतर परीक्षा घेता येऊ शकते. शिक्षणमंत्र्यांचा हा निर्णय स्वागतार्ह आहे.

बॉक्स

ही ढकलगाडी काय कामाची

मागील वर्षभरापासून शाळा बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरु होते. यातून मुलांचा शिक्षकांसोबत परस्पर संबंध येत नसल्याने शिक्षणाचा उद्देश पूर्ण होत नसल्याची ओरड होत असतानाच आता शिक्षणमंत्र्यांनी सरसकट सर्वांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, शैक्षणिक मूल्यमापन झाले नसल्याने सरसकट पास करण्याचा निर्णय विद्यार्थ्याच्या दृष्टीने चुकीचा असल्याची ओरड आहे.

बॉक्स

शिक्षणतज्ज्ञ म्हणतात

पहिली ते आठवी विद्यार्थ्यांचा पाया आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने परीक्षा न घेता सरसकट पास करण्याचा निर्णय न घेता पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. ऑनलाईन परीक्षा घेता येऊ शकतात. आता परीक्षा झाली नाही तर शिक्षणाचे गांभीर्य मुलांमध्ये राहणार नाही.

प्रा. डॉ. राजश्री मार्कंडेवार

Web Title: Scholarship exams can happen, so why not school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.