शिष्यवृत्ती द्या अन्यथा आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:43 AM2019-01-11T00:43:45+5:302019-01-11T00:45:34+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी शासनाने सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. सन २०११ पासून ते सन २०१४ पर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी शासनाने सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. सन २०११ पासून ते सन २०१४ पर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत होती. परंतु, मागील तीन वर्र्षांपासून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एक महिन्यात शिष्यवृत्ती मिळाली नाही तर जि. प. समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गोंडवाना गणतंत्र पार्टीने निवेदनातून दिला आहे.
२०१५-१६, २०१६-१७ या वर्षाची शैक्षणिक शिष्यवृत्ती पूर्णत: मिळाली नाही. २०१७-१८ या वर्षाची शिष्यवृत्ती काहींना मिळाली तर हजारो विद्यार्थी वंचित आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपयांची तरतूद केली जाते. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्या जात आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. सुवर्ण शिष्यवृत्तीची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि निष्काळजी धोरण राबविणाºया संबंधित अधिकºयांना निलंबीत करण्याची मागणी शिक्षणाधिकारी (प्रा.) दीपेंद्र लोखंडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम, अरूण आत्राम, महेश सोयाम उपस्थित होते.