शाळेची घंटा वाजली; पण विद्यार्थी अनुपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:39 PM2019-02-05T22:39:39+5:302019-02-05T22:39:58+5:30
चिमूर पंचायत समिती अंतर्गत कोलारा (तु) येथील जि.प. शाळेला सर्व ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी यांच्या व शिक्षकांच्या कारभारामुळे शनिवारी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशीसुद्धा शाळेची घंटा वाजली. परंतु शाळा विद्यार्थीविना राहिली. कोलारा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने मागण्यावर ठाम राहून एकही विद्यार्थी शाळेत न पाठविण्याचा पवित्रा घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मासळ (बु.): चिमूर पंचायत समिती अंतर्गत कोलारा (तु) येथील जि.प. शाळेला सर्व ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी यांच्या व शिक्षकांच्या कारभारामुळे शनिवारी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशीसुद्धा शाळेची घंटा वाजली. परंतु शाळा विद्यार्थीविना राहिली. कोलारा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने मागण्यावर ठाम राहून एकही विद्यार्थी शाळेत न पाठविण्याचा पवित्रा घेतला आहे.
कोलारा तु. येथील जिल्हा परीषद शाळेच्या मुलांच्या हातून शिक्षकांनी केलेल्या गैरकृत्याविरोधात कोलारा ग्रामस्थांनी पंचायत समिती चिमूर येथे तक्रार केली. त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी गटशिक्षण अधिकारी आले होते.
त्यावेळी गावकºयांसोबत असभ्य वर्तन केले, असा आरोप ग्रामस्थांनी केला. सोमवारीसुध्दा शाळा कुलुप बंद ठेवण्यात आली.
गटविकास अधिकारी जाधव व जि.प. सदस्य गजानन बुटके यांच्या मध्यस्थीने अखेर तीन शिक्षिकांच्या बदलीचे लेखी आदेश केंद्र प्रमुख घोनमोडे यांनी शाळा व्यवस्थापन समिती यांना दिल्यानंतर शाळा उघडण्यात आली. परंतु शाळा व्यवस्थापन सामिती व ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने शाळेत एकाही विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले नाही.