सोनेगावच्या विद्यार्थ्यांचा शाळेवर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:16 AM2017-09-28T00:16:15+5:302017-09-28T00:16:37+5:30
शाळा सुधार निधी व इतर निधीचा हिशोब व्यवस्थापन समितीला दिला नाही. यासह इतर कारणावरुन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडूरंग डाखोरे यांनी मुख्यकार्यपालन अधिकाºयांना तक्रार केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : शाळा सुधार निधी व इतर निधीचा हिशोब व्यवस्थापन समितीला दिला नाही. यासह इतर कारणावरुन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पांडूरंग डाखोरे यांनी मुख्यकार्यपालन अधिकाºयांना तक्रार केली. पंधरा दिवसानंतरही शिक्षण विभागाने कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे गावकºयांनी बुधवारपासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे बंद करुन शाळेवर बहिष्कार टाकला आहे.
नगर परिषद हद्दीमध्ये समाविष्ट असलेल्या सोनेगाव (बेगडे) येथे जिल्हा परिषदेची १ ते ८ पर्यंत शाळा आहे. या शाळेवर आठ वर्गासाठी सात शिक्षक कार्यरत असून ११४ विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. शाळेच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची निर्मिती करण्यात आली. मात्र या शाळेत मुख्याध्यापक म्हणून जी. वाय. मून रुजू झाल्यापासून सन २००९ पासून शाळा सुधार निधी व इतर निधीचा हिशोब व्यवस्थापन समितीला दिला नाही.
देशाचा भावी नागरिक घडावा म्हणून गावा-गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात. सोनेगाव (बेगडे) या दीड हजार लोकवस्तीच्या गावात जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ८ पर्यंत शाळा आहे. या शाळेत ११४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे म्हणून आरटीई कायदा केला. त्यानुसार शाळेवर विद्यार्थ्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या जातात. या शाळेवर मुख्याध्यापक म्हणून जी. वाय. मून रुजू झाल्यापासून मागील अनके वर्षापासून शाळा सुधार फंड व इतर फंडाच्या निधीचा हिशोब शाळा व्यवस्थापन समितीला दिला नाही तर व्यवस्थापन समितीने हिशोब मागितला तर त्यांच्याकडून धमकी देण्यात येते, असा आरोप अध्यक्षाकडून करण्यात आला आहे. तर मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षक यांच्यातील अंतर्गत मतभेदामुळे अध्यापन करता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास खुटला आहे. त्यामुळे या वादग्रस्त मुख्याध्यापकांची बदली करत सन २००९ पासून शाळेचे सर्व व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी पाडूरंग डाखोरे यांनी निवेदनातून केली आहे.
निवेदनाला पंधरा दिवसांचा कालावधी लोटूनही एकाही अधिकाºयांनी शाळेवर भेट दिली नाही. त्यामुळे शिक्षणविभागाच्या लेटलतीफ कारभाराने गावकरी त्रस्त होवून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविने बंद करुन बेमूदत शाळेवर बहिष्कार टाकला. जोपर्यंत सर्व प्रकाराची चौकशी करुन मुख्याध्यापक जि. वाय. मून यांच्यावर कारवाई होत नाही. तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय गावकºयांनी घेतल्याने शिक्षणविभागाची पंचाईत झाली आहे.
अन् मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी संंवाद
गावकºयांनी शाळेत विद्यार्थी पाठविने बंद केल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य तथा गट नेता डॉ. सतीश वारजुकर यांनी शाळेवर भेट देवून पालकांशी चर्चा करुन थेट मुख्य कार्यपालन अधिकाºयांशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क करत गावकºयांच्या समस्यांशी अवगत केले. सात दिवसात शाळेतील सर्व प्रकाराची चौकशी करण्यासंबंधी अधिकाºयांना सांगून शाळा पूर्ववत सुरु करण्यासाठी पालकांनी सहकार्य करावे. असे आवाहन जि.प. सदस्य डॉ. वारजुकर यांनी केले आहे.