अग्निशमन यंत्रणेविनाच धावताहेत स्कूल बसेस

By admin | Published: June 23, 2014 11:48 PM2014-06-23T23:48:50+5:302014-06-23T23:48:50+5:30

परिवहन विभागाकडून स्कुल बस चालविण्यासाठी कठोर नियम असतानाही जिल्ह्यातील अनेक स्कुलबस बिनदिक्कतपणे विद्यार्थ्यांना ने-आण करीत आहेत. नियमाना धाब्यावर बसवून राजरोसपणे

School Buses Running Without Fire Station | अग्निशमन यंत्रणेविनाच धावताहेत स्कूल बसेस

अग्निशमन यंत्रणेविनाच धावताहेत स्कूल बसेस

Next

चंद्रपूर : परिवहन विभागाकडून स्कुल बस चालविण्यासाठी कठोर नियम असतानाही जिल्ह्यातील अनेक स्कुलबस बिनदिक्कतपणे विद्यार्थ्यांना ने-आण करीत आहेत. नियमाना धाब्यावर बसवून राजरोसपणे चालविण्यात येणाऱ्या या स्कुलबसवर कठोर कारवाईची गरज असतानाही परिवहन विभाग दुर्लक्ष करीत आहे.
सध्या काही खासगी शाळा सुरु झाल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांना स्कुलबसची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यासाठी पालकांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते. मात्र या स्कुलबसमध्ये विद्यार्थी किती सुरक्षित असतो, याकडे कुणीही लक्ष देत नाही. संस्थाचालक केवळ पैसा जमा करण्यात व्यस्त असतानाच पालकही बसमधील सुविधेकडे दुर्लक्ष करतो. मात्र एखाद्यावेळी अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
स्कुलबस चालविताना स्पीड गर्व्हरनरसह अग्निशमन यंत्रणा बसविणे अत्यावश्यक आहे. मात्र या बसमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्याची तसदी शाळा व्यवस्थापन दाखवित नाही. एखाद्यावेळी बसला अचानक आग लागल्यास कोणतीही व्यवस्था बसमध्ये नसल्याने मोठा अनर्थ होऊ शकतो. परिवहन विभागाकडून पॉसिंग करून आणल्यानंतर या स्कुलबसची योग्य देखभाल सुध्दा केल्या जात नाही. बसमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरश: कोंबून नेण्यात येतात. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसला जाळी लावावी लागते, मात्र अनेक बसला साधी जाळी लावण्यात येत नाही. विद्यार्थ्यांना चढताना आणि उतरताना अपघात होऊ नये यासाठी वाहकाची गरज असते. मात्र शाळा व्यवस्थापन पैसे वाचविण्यासाठी वाहकाची नियुक्ती सुध्दा करीत नाही. त्यामुळे चिमुकल्यांना स्वत:ची सुरक्षा स्वत:च करावी लागते. यासोबतच बसमध्ये प्रथमोपचार पेटी, विद्यार्थ्यांच्या वयानुसार बैठक व्यवस्था असायला पाहिजे. नर्सरी ते दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना एकच बैठक व्यवस्था असलेल्या बसमधून ने-आण करण्यात येतात. परिवहन विभागाकडून लावण्यात आलेल्या नियमांना तिरांजली देत जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन वाट्टेल तशा स्कुलबस चालवित आहे. त्यामुळे आता पालकांनी जागृत राहून बसमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळा व्यवस्थापनाला जाब विचारणे अत्यावश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: School Buses Running Without Fire Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.