वरोऱ्यात शालेय मुलींची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा शनिवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:04 PM2018-12-24T23:04:18+5:302018-12-24T23:04:39+5:30
वरोऱ्यात प्रथमच १९ वर्षाखालील मुलींच्या ६४ व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दि. २९ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान लोकशिक्षण संस्थेच्या मैदानावर करण्यात आले आहे. सामने हे दि. ३० डिसेंबरला सकाळपासून घेण्यात येणार आहे. स्पर्धेत भारतातील ४४ मुलींचे संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती आमदार बाळू धानोरकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वरोऱ्यात प्रथमच १९ वर्षाखालील मुलींच्या ६४ व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दि. २९ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान लोकशिक्षण संस्थेच्या मैदानावर करण्यात आले आहे. सामने हे दि. ३० डिसेंबरला सकाळपासून घेण्यात येणार आहे. स्पर्धेत भारतातील ४४ मुलींचे संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती आमदार बाळू धानोरकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
स्कूल गेम्स फेडरेशन आॅफ इंडिया, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा मल्टीपर्पज स्पोर्टस अॅन्ड व्हॉलीबॉल असोसिएशन व लोकशिक्षण संस्था वरोरा यांच्या संयुक्त ही राष्ट्रीय स्पर्धा होत आहे. स्पर्धेकरिता चार मैदाने तयार केली असून स्पर्धा सकाळी व रात्री विद्युत प्रकाश झोतात खेळविली जाणार आहे. स्पर्धकांच्या निवासाची व्यवस्था शहरातील विविध ठिकाणी करण्यात आहे. प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय शालेय स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच रोख बक्षिसे दिले जाणार आहे हे विशेष. स्पर्धेची तयारी मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे व अन्य विभागाचे अधिकारी तयारीवर लक्ष ठेवून आहे.
बाळू धानोरकर यांनी केला आर्थिक अडथळा दूर
शासनाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत ३ लाख रुपये उपलब्ध करून दिले. मात्र या निधीत ही स्पर्धा शक्य नसल्याने वरोरा-भद्रावती मतदार संघाचे आ. बाळू धानोरकर यांनी पुढाकार घेऊन आपल्या आमदार निधीतून ५ लाख रुपये उपलब्ध करून दिल्याने या स्पर्धेच्या आयोजनातील आर्थिक अडथळा दूर झाला आहे. वास्तविक, सर्व सोई-सुविधांचा विचार करता आयोजनाचा खर्च १४ लाखांच्या घरात जातो. उर्वरित निधीची तरतूद करण्याची ग्वाही आ. बाळू धानोरकर यांनी दिली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी यावेळी दिली.