शाळेची धुरा आता स्थानिक समितीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:01+5:302021-07-09T04:19:01+5:30
या समितीचे अध्यक्ष हे गावचे सरपंच राहणार असून, तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख ...
या समितीचे अध्यक्ष हे गावचे सरपंच राहणार असून, तलाठी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख या समितीचे सदस्य असणार आहेत. गावातील शाळा सुरू करावयाची असेल तर त्या गावात किमान एक महिना संबंधित गावातील कोविड रुग्ण आढळून आलेला नसावा. शिक्षकांचे लसीकरण प्राध्यान्याने करण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांनी पाठपुरावा करावा. गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत प्रवेश देऊ नये. एखादा विद्यार्थी कोविडग्रस्त आढळल्यास तात्काळ शाळा बंद करून मुख्याध्यापकांनी तात्काळ निर्जंतुकीकरणाची कार्यवाही करावी व विद्यार्थ्याचे अलगीकरण करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरू करावेत. विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसवावा. दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे आदी आणखी काही सूचना यासंदर्भात देण्यात आल्या आहेत. आता या समित्या या सूचनांना कसा प्रतिसाद देतात, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष वेधले आहे.