दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:20 AM2021-07-01T04:20:37+5:302021-07-01T04:20:37+5:30
कोरोनामुळे यावर्षी प्रथमच दहावीची परीक्षा रद्द झाली. त्यामुळे निकाल कसा लावावा, पुढील प्रवेश प्रक्रिया याबाबत काही दिवस संभ्रम निर्माण ...
कोरोनामुळे यावर्षी प्रथमच दहावीची परीक्षा रद्द झाली. त्यामुळे निकाल कसा लावावा, पुढील प्रवेश प्रक्रिया याबाबत काही दिवस संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विहित मर्यादेत गुणपत्रिका देणे आवश्यक आहे. त्यासाठी बोर्डाने शाळांकडून ऑनलाइन माहिती मागविली आहे. ही माहिती ऑनलाइन भरताना शाळांची मोठी दमछाक होत आहे. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करून त्यांच्या गुणांची माहिती बोर्डाकडे ऑनलाइन भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांनी ही माहिती विहित मुदतीत भरलीच नाही. त्यामुळे दहावीच्या निकालास उशीर झाल्यास ही जबाबदारी संबंधित शाळांवर येणार आहे. विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यासाठी परीक्षा मंडळाने फाॅर्म्युला दिला आहे. मागील वर्षीचे गुण, अंतर्गत चाचण्यांचे गुण, तोंडी परीक्षा व विषयनिहाय वेगवेगळी गुणांकन पद्धत आहे. यामुळे काही शाळांना अडचणींना सामना करावा लागत आहे.
बॅक्स७६
टक्के शाळांनीच टप्पा पूर्ण केला
बाक्स
जिल्ह्यातील दहावीतील विद्यार्थी -३४४६४
मुले-१७३६३
मुली-१६०९८
१.काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे नववीचे गुणपत्रक नसल्यामुळे दहावीचे गुणदान करताना अडचणी येत आहेत.
२. ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये इंटरनेटच्या अडचणी निर्माण होत आहेत.
३. जिल्ह्यातील बहुतांश शाळांचे गुणदानाचे काम पूर्ण झाले आहे. नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थींचे गुणांकन करताना अडचणी येत आहेत.
कोट
दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण देण्याचे अधिकार समितीला आहेत. मूल्यमापन प्रक्रिया ऑनलाइन असून, शाळांनी ऑनलाइन माहिती भरायची आहे. यासाठी मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. शाळांकडे सात्यत्याने पाठपुरावा केला जात आहे.
-उल्हास नरड
शिक्षणाधिकारी, चंद्रपूर
बाॅक्स
मुख्याध्यापक काय म्हणतात.....
दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. बोर्डाच्या नियमानुसार गुणदान प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली आहे.
-हरिहर भांडवलकर
मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश स्कूल, चंद्रपूर
कोट
विद्यार्थ्यांची गुणवत्ता लक्षात घेता मूल्यमापन करून गुण दिल्या जात आहेत. मंडळाने दिलेल्या नियमांनुसार गुणदान केले जात आहे. मूल्यमापनाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, लवकरच निकाल लागण्याची शक्यता आहे.
-राजू साखरकर
स्व. बापूराव वानखेडे, विद्यालय, चंद्रपूर