वसतिगृहाच्या वादात शाळेचा रस्ता बंद
By admin | Published: January 23, 2015 12:31 AM2015-01-23T00:31:01+5:302015-01-23T00:31:01+5:30
येथील नेवजाबाई हितकारणी हायस्कूलच्याअगदी समोर आदिवासी मुलींचे वसतीगृह बांधण्यात आले. त्यामुळे शाळेचा रस्ता बंद झाला आहे.
ब्रह्मपुरी : येथील नेवजाबाई हितकारणी हायस्कूलच्याअगदी समोर आदिवासी मुलींचे वसतीगृह बांधण्यात आले. त्यामुळे शाळेचा रस्ता बंद झाला आहे. यासंबंधात संस्थेच्या सचिवांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
शासकीय जागेवर आदिवासी मुलींचे वसतीगृह बांधण्यात आले आहे. याच वसतीगृहाच्या मधातून नेवजाबाई हितकारणी मुलांचे हायस्कुल ध्यानदास टेकडीकडे जाण्याचा मार्ग आहे. मात्र कोणतीही सूचना न देता रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा प्रश्न आहे. आदिवासी विभागाला वसतीगृह हस्तांतरीत करायचे असल्याने सदर रस्ता बंद करावा लागत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. तर कुठलिही सूचना न देता रस्ता बंद केल्याचे संस्थेचे सचिव अशोक भैय्या यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात ब्रह्मपुरी पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)