शिक्षकांच्या कल्पनेतून सजली गिरगावची शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:20+5:302021-05-25T04:32:20+5:30

पेंटिंगच्या रूपातून शाळेच्या भिंतीवर साकारला किल्ला; ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचेही योगदान फोटो सावरगाव : नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील ...

The school of Sajli Girgaon from the imagination of the teacher | शिक्षकांच्या कल्पनेतून सजली गिरगावची शाळा

शिक्षकांच्या कल्पनेतून सजली गिरगावची शाळा

Next

पेंटिंगच्या रूपातून शाळेच्या भिंतीवर साकारला किल्ला; ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीचेही योगदान

फोटो

सावरगाव : नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या भिंतीवर बाला पेंटिंगच्या रुपाने चंद्रपुरातील जटपुरा गेट, ताडोबा अभयारण्य, घोडाझरी तलाव प्रकल्प, आदी चित्र भिंतीवर प्रत्यक्षात साकारून जिल्ह्याचा वारसा भिंतीवर प्रगटला आणि शाळा सुंदरतेने सजविण्यात भर पडली. त्यामुळे मुलांना शाळेचे आकर्षण निर्माण होईल.

मागील लाॅकडाऊनच्या काळापासून विद्यार्थ्यांना बाहेरूनच शिक्षण देण्यात आले . मात्र शाळेचे आकर्षण विद्यार्थ्यांत टिकून राहावे याकरिता काही तरी वेगळे करण्याची कल्पना सुचवून यातूनच पुढे आली ती '' बाला पेंटिंग '' म्हणजेच '' वॉल पेंटिंग ''. यात प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यातील मुख्य ओळख चंद्रपूरचे जटपुरा गेट, ताडोबा अभयारण्यातील वन्यजीव, घोडाझरी तलाव, यांचे चित्रण साकार करण्याची कल्पना, मात्र या कल्पनेला प्रत्यक्षात साकार करण्याकरिता येणारा खर्च हा जवळपास एक लक्ष रुपये एवढा होता. मात्र या गावातील ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकांच्या या कल्पनेला साकार करण्याकरिता सर्वतोपरी मदत करण्याची हमी दिली. व स्वतः शिक्षकांनी ही मदत करून या पेंटिंगकरिता गावातील तरुण पेंटरला पाचारण करण्यात आले. त्यांनी अतिशय सुंदर व वास्तविक जिवंत पेंटिंग करून संपूर्ण शाळा परिसर, मुख्य द्वार रंगवून काढले. पेंटिंगमधून विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यातील इतिहासातील चित्रकृती अतिशय जवळून अनुभवण्याची अनुभूती मिळते.

या प्रकारच्या वेगवेगळ्या कल्पना मांडून ते उपक्रम राबविणारे उपक्रमशील शिक्षक योगेश भगत व त्यांच्या कल्पना पूर्ण करण्याकरता नेहमी सहकार्यास सदैव तत्पर असणारे माजी मुख्याध्यापक उद्धव मांढरे, कार्यरत मुख्याध्यापिका माया कामडी व सहायक शिक्षक पर्वते, घोरुडे, लोनबले, सहायक शिक्षिका प्रभा कामडी यांचेही योगदान या चित्राकृतीसाठी महत्त्वाचे ठरले.

Web Title: The school of Sajli Girgaon from the imagination of the teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.