विषयतज्ज्ञांच्या भेटीत शाळा सुरू मात्र शिक्षकच गायब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:29 AM2021-09-25T04:29:55+5:302021-09-25T04:29:55+5:30
सिंदेवाही : ...
सिंदेवाही : शिक्षणाचा दर्जा तपासण्यासाठी विषयतज्ज्ञांनी शाळांना भेटी दिल्या. मात्र, यावेळी शिक्षकच गायब असल्याचा धक्कादायक प्रकार सिंदेवाही केंद्रातील जाटलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वी पंचायत समिती सभापती मंदा बाळबुध्ये यांनी केंद्रप्रमुखांना सोबत घेऊन शाळेची चौकशी केली होती. शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी वेळेचे बंधन पाळणे व गृहभेटीतून अभ्यासक्रम नियमित करण्याचे निर्देश देऊनही दोन्ही शिक्षकांनी ठेंगा दाखविला.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षक संस्था (डायट) चंद्रपूरअंतर्गत गट साधन केंद्र पंचायत समिती सिंदेवाहीमधील विषयतज्ज्ञांनी शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता भेट दिली. भेटीप्रसंगी एकही शिक्षक शाळेत उपस्थित नसल्याचे दिसून आले. यावेळी शालेय पोषण आहार शिजविणारी ताई व त्यांच्यासोबत दोन विद्यार्थिनी वर्गात बसून असल्याचे दिसून आले. विषयतज्ज्ञांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांशी संपर्क साधला असता या दिवशी साहाय्यक शिक्षकांची पाळी असल्याचे विषयतज्ज्ञांना माहिती दिली. सकाळी ११.३० वाजता विद्यार्थ्यांची गृहभेट घेतली. पाच-सहा इयत्ता, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक प्रगतीचा मागोवा घेतला, तेव्हा अपेक्षित प्रगती दिसून आली नाही. पालकांना याबाबत विचारले असता त्यांनी शिक्षक गृहभेटी देत नसल्याने मुले अभ्यासात मागे पडत असल्याचे सांगितले. विषयतज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना गटनिहाय कृतीतून शैक्षणिक साधनांद्वारे भाषा, गणित व इंग्रजी विषयावरील मूलभूत अध्ययन अनुभव दिले. यापूर्वीही ’ने प्रकाशित केले होते, हे उल्लेखनीय.
बॉक्स
अनेक ठिकाणी शाळा समितीच्या नाहीत
शाळा व्यवस्थापन समित्यांमुळे शिक्षणाचा दर्जा उत्तम राखण्यास मदत होते. अध्यापन व अध्ययनासाठीही समिती सक्रिय असणे गरजेचे आहे. मात्र, तालुक्यात काही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शाळा समित्यांचे अस्तित्व नामपात्र आहे. परिणामी काही शिक्षक याचा गैरफायदा घेत आहेत. यातून काही शिक्षकांची मनमानी सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.