स्कूलबसमुळे वाहनधारकांना अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:34 AM2021-02-17T04:34:08+5:302021-02-17T04:34:08+5:30

कर्मचाऱ्यांची वाहनधारकांशी अरेरावी चंद्रपूर : येथील काही पेट्रोलपंपावर वाहनधारकांशी कर्मचारी अरेरावी करीत असल्याचा प्रकार घडत आहे. त्यांच्या ...

Schoolbus obstructs vehicle owners | स्कूलबसमुळे वाहनधारकांना अडथळा

स्कूलबसमुळे वाहनधारकांना अडथळा

Next

कर्मचाऱ्यांची वाहनधारकांशी अरेरावी

चंद्रपूर : येथील काही पेट्रोलपंपावर वाहनधारकांशी कर्मचारी अरेरावी करीत असल्याचा प्रकार घडत आहे. त्यांच्या वागण्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. कर्मचाऱ्यांना समज द्यावी, अशी मागणी होत आहे.

पोलिसांनी मजनूंना समज द्यावी

चंद्रपूर : दाताळा, पठाणपुरा, रामाळा तलाव परिसरामध्ये मोठ्या संख्येने मजनू रस्त्यावर चाळे करतात. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पोलिसांनी या मजनूंना समज द्यावी, अशी मागणी होत आहे.

कुत्र्यांचा धुमाकुळामुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डांमध्ये कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यांच्या उपद्रवामुळे अनेकवेळा नागरिक जखमीही झाले आहेत. यासंदर्भात नगरसेवकाला कळवूनही लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

घुग्घुस-माजरी बस सुरू करण्याची मागणी

माजरी : घुग्घुस, माजरी परिसरात मोठ्या प्रमाणात कोळसा उद्योग आहे. या दोन्ही शहराकडे कामगार व ग्रामीण नागरिकांची सतत ये-जा असते. घुग्घुस ते माजरीदरम्यान मुरसा, कोच्ची, पिपरी, सुमठाणा, कोंडा आदी गावातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करावी लागते. त्याकरिता घुग्घुस-माजरी बस सुरू करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

नाल्या तुंबल्याने आरोग्य धोक्यात

ब्रह्मपुरी : तालुक्यातील काही गावातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

रानडुकरांमुळे शेतकरी त्रस्त

कोरपना : परिक्षेत्रातील अनेक गावांमध्ये रानडुकरांचा हैदोस सुरू आहे. यामुळे शेतातील पीक नष्ट होत आहे. यावर वनविभागाने तातडीची उपाययोजना करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Schoolbus obstructs vehicle owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.