शिक्षण विभागात भरविली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 11:49 PM2018-01-22T23:49:03+5:302018-01-22T23:49:30+5:30

शासनाच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व गैरसोयी होत आहेत.

Schools filled in education department | शिक्षण विभागात भरविली शाळा

शिक्षण विभागात भरविली शाळा

Next
ठळक मुद्देआंदोलनकर्ते विद्यार्थ्यांच्या गणवेशात : शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा विरोध

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : शासनाच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व गैरसोयी होत आहेत. शासनाच्या या धोरणाच्या निषेधार्थ मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात धडक देऊन तिथे प्रतिकात्मक शाळाच भरविली. यावेळी शासनविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोमवारी अचानक एक तास चाललेल्या या आंदोलनामुळे जि.प. वर्तुळात एकच खळबळ उडाली.
कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून पालकवर्गही यामुळे त्रस्त झाला आहे. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाविरोधात मनसेचे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे पदाधिकाºयांनी ‘शिक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवणाºया शासनाचा निषेध असो’ अशी जोरदार घोषणाबाजी करीत शिक्षण विभागाचे कार्यालय दणाणून सोडले.
यावेळी शिक्षणाधिकाºयानी मनसे पदाधिकाऱ्यांची म्हणणे ऐकून घेतले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. शाळा बंद करून त्याचे समायोजन करताना विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे शाळेत जाणेही बंद झाले आहे, अशी माहितीही शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली. जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द न केल्यास येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनदीप रोडे व आंदोलनकर्त्यांनी दिला. सदर आंदोलनात शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, राहुल चव्हाण, व्यंकटेश मुक्तलवार, सचीन कोतपल्लीवार, सुमित खेडनकर, सुमित करपे, नितीन बावणे, नितीन कुमरे, नगाजी गंफाळे, राहुल मंडल, सतीश नैताम, प्रकाश कुमरे, राकेश चव्हाण, गितेश मडावी, सन्नी मंडल, अनिल हजारे, अजय मुक्तलवार, इरफान खान, दीपक दवारकर, रितेश मांडवकर, विपुल नांदेकर आदी सहभागी झाले होते.
प्रश्नांची सरबत्ती
शासन शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करते. शिक्षकांना भरमसाठ वेतन देण्यात येत असताना शाळेतील पटसंख्या कमी का होत आहे ? मोफत शिक्षण सोडून पैसे भरून विद्यार्थी खासगी शाळेकडे का जात आहे, यासारख्या प्रश्नांची सरबत्ती आंदोलनकर्त्यांनी शिक्षणाधिकाºयांसमोर केली. दरम्यान, शिक्षण विभागावरील होणारा खर्चाचा योग्य ताळेबंद लावून त्याचा सदुपयोग करावा. जेणेकरून शासनावर शाळा बंद करण्याची नामुष्की ओढवणार नाही, असे मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले.
आंदोलनाने लक्ष वेधले
विद्यार्थ्यांच्या गणवेशात मनसे पदाधिकारी अचानक जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यानंतर शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनकर्ते शिक्षण विभागात पोहचून तिथे जमिनीवरच ठाण मांडले. हे आंदोलन जिल्हाभरातून जिल्हा परिषदेत येणाºयांचे लक्ष वेधून घेत होते. दुसरीकडे अचानक झालेल्या या आंदोलनामुळे शिक्षण विभागाचे अधिकारी हादरून गेले होते.

Web Title: Schools filled in education department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.