कोरोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी शाळांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:37 AM2021-02-27T04:37:23+5:302021-02-27T04:37:23+5:30
जिल्ह्यातील ५ ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, याच काळामध्ये कोरोना संकटही वाढले असून रुग्णसंख्या सातत्याने वाढत ...
जिल्ह्यातील ५ ते १२ वीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, याच काळामध्ये कोरोना संकटही वाढले असून रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकऱ्यांनी एक आदेश पारित केला आहे. त्यामध्ये शाळा, काॅलेजमध्ये शासनाने लावून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने प्रत्येक तालुक्यात एक संपर्क प्रमुखाची नियुक्ती केली आहे. सदर संपर्कप्रमुख आठवड्यातून एकदा शाळांना भेट देणार आहेत, तर त्यांच्या अधिनस्त शाळांची तपासणी करण्यासाठी पथकाचेही गठण करण्यात येणार आहे. याद्वारे शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह, शिक्षक, कर्मचारी मास्कचा वापर करतात का, प्रत्येक वर्गात सॅनिटायझर किंवा साबण आहे काय, संशयित विद्यार्थ्यांची चाचणी केली काय, आदींवर लक्ष ठेवून तसा अहवाल शिक्षण विभागाला पाठविण्यात येणार आहे.
बाॅक्स
यांच्यावर आहे जबाबदारी
तालुका संपर्क अधिकारी
चंद्रपूर पूनम म्हस्के
बल्लारपूर डाॅ. पल्हाद खुणे
मूल गणेश चव्हाण
भद्रावती मनोज गौरकार
चिमूर अरुण काकडे
राजुरा सावन चालखुरे
कोरपना संजयकुमार मेश्राम
जिवती अमोल बल्लावार
पोंभुर्णा अर्चना मासिरकर
गोंडपिपरी विनोद लवांडे
सावली गणेश येरणे
सिंदेवाही डाॅ. ज्योती राजपूत
नागभीड रवींद्र तामगाडगे
ब्रह्मपुरी लोकनाख खंडारे
वरोरा प्रकाश महाकाळकर
बाॅक्स
ही आहे जबाबदारी
मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मास्कचा वापर करतात काय, प्रत्येक वर्गात सॅनिटायझर अथवा साबण उपलब्ध आहे काय, संशयित विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेणे, सुरक्षाविषयक नियमांचे पालन करणे, विद्यार्थी वारंवार हात धुतात काय?
बाॅक्स
निवेदनाकडे दुर्लक्ष
शाळा सुरू झाल्या असून कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या शाळा भेटी टाळाव्या यासाठी येथील पुरोगामी शिक्षण संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. विशेष म्हणजे, १५ व १० नोव्हेंबरच्या शासन निर्णयाचाही यामध्ये उल्लेख केला असून यानुसार विद्यार्थी तसेच शिक्षकांना वगळता इतरांना शाळेत प्रवेश करू देऊ नये, असे नमूद केले आहे. विद्यार्थी तसेच इतरांच्या शाळा भेटी वाढत असून अनेक जण कोरोना चाचणीही करीत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र, प्रशासनाने या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याचे पुरोगामी शिक्षक संघटनेचे म्हणणे आहे. शाळाभेटी टाळण्यासाठी राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य नेते विजय भोगेकर, जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे,
आदींच्या शिष्टमंडळांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.