रोबोटिक्स कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:23 AM2019-09-03T00:23:45+5:302019-09-03T00:24:12+5:30
कार्यशाळेमध्ये न. प. गांधी विद्यालय बल्लारपूर, श्री. बालाजी हायस्कूल बामणी, माऊंट हायस्कूल बल्लारपूर, गुरूनानाक पब्लिक स्कूल, दिलासाग्राम हायस्कूल, आयडियल इंग्लिश मिडीअम स्कूल या सहा शाळेतील वर्ग ६ ते १२ मध्ये शिकणारे ५८ विद्यार्थी सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अटल टिंकरिंग लॅबमार्फत एनआरसी इंडिया व इनोव्हेशन सेल आयआयटी मुंबई यांच्या सहकार्याने नगर परिषद बल्लारपूर संचालित न. पं. गांधी विद्यालयात दोन दिवसीय रोबोटिक्स कार्यशाळा मुख्याधिकारी विपीन मुध्दा, उपमुख्याधिकारी, अभिजीत मोटघरे यांच्या मार्गदर्शनात नुकतीच पार पडली.
कार्यशाळेमध्ये न. प. गांधी विद्यालय बल्लारपूर, श्री. बालाजी हायस्कूल बामणी, माऊंट हायस्कूल बल्लारपूर, गुरूनानाक पब्लिक स्कूल, दिलासाग्राम हायस्कूल, आयडियल इंग्लिश मिडीअम स्कूल या सहा शाळेतील वर्ग ६ ते १२ मध्ये शिकणारे ५८ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी एनआरसी इंडिया मुंबई येथील रोबीटिक्स प्रशिक्षक श्रवण सिंग यांनी रोबोटिक्स बेसिक, ऑबस्टॅकल फ्लोअर, ऑबस्टॅकल अवॉईडर, ब्लॅकलाईन फ्लोअर, व्हाईट लाईन फ्लोअर, वायरलेस रोबोट, वायर्ड रोबोट आदीबाबत प्रात्याक्षिकासह संपूर्ण माहिती दिली. ५ मुलांच्या प्रत्येक गटास रोबोटचे सुटे भाग देऊन विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष रोबोट बनवून घेण्यात आले. शेवटी वायर्ड राबोट कंट्रोलसह झोनल राऊं ड स्पर्धा घेण्यात आली. यातील १५ विद्यार्थ्यांची मुंबई येथे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या व एक लाख रुपये पारितोषिक असलेल्या एनआरसी ग्रँड फिनालेसाठी निवड करण्यात आली. कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी प्रमाणपत्र तर स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मेरीट प्रमाणपत्र तर ५ स्पर्धकांच्या गटास रोबोटिक्स कीटचे वितरण एनआरएच इंडिया व इनोवेशन सेल आयटीआय मुंबई यांच्यामार्फत देण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी मुद्धा यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेसाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर माडेकर, दत्तुजी भलवे, शिक्षक मनोज डोभळे यांच्यासह नगरपालिकाचे कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.