टेस्टट्युब बेबी उपचारासाठी रजेची मागणी
By admin | Published: May 1, 2017 12:46 AM2017-05-01T00:46:39+5:302017-05-01T00:46:39+5:30
महिला शिक्षिका व महिला कर्मचाऱ्यांना वाढते प्रदूषण, धकाधकीचे जीवन व कामातील वाढत्या तणावामुळे मूल न होण्याचे प्रमाण वाढत आहे.
महिला व बालविकास मंत्र्यांना निवेदन : चार वर्षांपासून रखडलेल्या बदल्या कराव्या
चंद्रपूर : महिला शिक्षिका व महिला कर्मचाऱ्यांना वाढते प्रदूषण, धकाधकीचे जीवन व कामातील वाढत्या तणावामुळे मूल न होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचा परिणाम कार्यालयीन कामाच्या क्षमतेवर होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना टेस्टट्युब बेबीसारखे उपचार करावे लागत आहे. या उपचारासाठी अनेक दिवसही लागतात. त्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक व विशेष रजा मंजूर करण्यात यावील अशी मागणी पुरोगामी महिला मंचाने राज्याच्या महिला ब वालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली.
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्याच्या ना. पंकजा मुंडे यांना त्यांच्या चंद्रपूर भेटीत शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पुरोगामी महिला मंचाने टेस्टट्युब बेबी उपचाराचा प्रश्न त्यांच्या समक्ष मांडला.
समितीने निवेदनात म्हटले की, चंद्रपूर जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून विविध कारणांनी शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या रखडल्या आहेत त्यामुळे अनेक शिक्षक त्रस्थ आहेत, ते ना धड कुटुंबाला न्याय देऊ शकत आहेत ना शाळेला. जिल्हा परिषदेच्या वेळकाढू धोरणामुळे बदल्या होतील,असे वाटत नाही, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रखडले आहे, विषय शिक्षक पदोन्नत्या रखडल्या आहेत. रोस्टर अपूर्ण आहे. या परिस्थितीत बदल्या होणे शक्य दिसत नाही. ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी बदल्यांसाठी जिल्हा परिषदेला निर्देश देण्याची मागणी करण्यात आली. विषय शिक्षक पदस्थापणा करण्यात यावी, समायोजन, प्रमोशन लवकर व्हावे, जिल्हा बदली शिक्षकांना भारमुक्त करण्यात यावे, अवघड क्षेत्र निवडतांना झालेला अन्याय दूर करावा व जिवती संपूर्ण अवघड, बदल्या समूपदेशन पद्धतीने व्हाव्या आदी विविध प्रलंबित मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात पुरोगामीचे विजय भोगेकर, हरीश ससनकर, दीपक वर्हेकर, निखिल तांबोळी, रवी सोयाम, पंकज उद्धरवार, मनोहर आलाम, दुष्यांत मत्ते, शालिनी देशपांडे, जयश्री दीक्षित, ज्योती लहामगे, वैशाली सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)