चंद्रपुरात वीज केंद्र प्रकल्पग्रसतांच्या विरुगिरीचा दुसरा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 01:48 PM2020-08-06T13:48:58+5:302020-08-06T13:49:17+5:30
प्रकल्पग्रस्तांमध्ये 5 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे, 5 ऑगस्टपासून सुरू झालेल्या विरुगिरी आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे, आंदोलक हे उपाशीपोटी असून त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : 1982 पासून रखडलेल्या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा यासाठी एकूण 7 प्रकल्पग्रस्त चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राच्या चिमणीवर चढून विरुगिरी करीत आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा 2 रा दिवस आहे.
प्रकल्पग्रस्तांमध्ये 5 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे, 5 ऑगस्टपासून सुरू झालेल्या विरुगिरी आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे, आंदोलक हे उपाशीपोटी असून त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही, प्रशासन फक्त ड्रोन ने त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच काम करीत आहे.
आंदोलकांनी मुख्य अभियंता घुगे व ओसवाल यांच्याशी संपर्क साधला मात्र तो झाला नसल्याचे समजते.
आंदोलकांनी सांगितले की काल पासून आमदार जोरगेवार, राजू झोडे, डॉ अभिलाषा गावतुरे यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या व आंदोलना नक्कीच यश मिळेल असा धीर दिला. आजपर्यंत नेत्यांनी आम्हाला आश्वासनांचा लॉलीपॉप दिला परंतु हे आंदोलन आरपार म्हणून आम्ही लढत आहो.
पोटात अन्न नसल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रकृती ढासळली आहे, इतकेच नव्हे तर महाजेनको तर्फे चिमणीवरची सप्लाय पण बंद करण्यात आली आहे.
आमची फक्त एकच मागणी आहे जिल्ह्यातील 650 प्रकल्पग्रस्तांना औष्णिक विद्युत केंद्रात तंत्रज्ञ 3 म्हणून कायमस्वरूपी नेमणूक करावी, अन्यथा आम्ही एकत्र चिमनिवरून उडी मारून आत्महत्या करू असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.