कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा जोर उतरणीला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:30 AM2021-05-11T04:30:08+5:302021-05-11T04:30:08+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार १९ जणांनी कोरोनावर मात केली. बरे होणाऱ्यांची संख्या आता ५९ हजार ६१९ झाली आहे. सध्या ...

The second wave of Corona infection is coming down! | कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा जोर उतरणीला !

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा जोर उतरणीला !

Next

जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार १९ जणांनी कोरोनावर मात केली. बरे होणाऱ्यांची संख्या आता ५९ हजार ६१९ झाली आहे. सध्या १२ हजार ६९४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा आरोग्य पथकाने ४ लाख १४ हजार २५९ नमुन्यांची तपासणी केली. त्यापैकी ३ लाख ३८ हजार ५८ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ११.......................... हजार १७ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १०३१, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ३५, यवतमाळ ३४, भंडारा १०, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोघांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत:ची व काळजी घ्यावी तसेच कोरोनाची लस घेऊन प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

असे आहेत मृत

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपुरातील ५५ वर्षीय पुरुष, गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील ५५ वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील ५१ वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील ३० वर्षीय महिला, घोटनिंबाळा ७५ वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील ५५ वर्षीय महिला, गडचांदूर येथील ५८ वर्षीय पुरुष, कोरपना तालुक्यातील ४० वर्षीय पुरुष, सावली तालुक्यातील २९ व ८५ वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील कच्चेपार येथील ५० वर्षीय पुरुष, नवेगाव पांडव येथील ३९ वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील वडाळा पैकू येथील ५८ वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील हनुमान नगर येथील ६५ वर्षीय पुरुष तर वडसा गडचिरोली येथील ४९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

तालुकानिहाय पॉझिटिव्ह

चंद्रपूर मनपा क्षेत्र २५२

चंद्रपूर तालुका ४७

बल्लारपूर ६५

भद्रावती ०१

ब्रह्मपुरी २०

नागभीड १७

सिंदेवाही ५९

मूल १०

सावली ३५

पोंभूर्णा ०४

गोंडपिपरी ५२

राजुरा ०२

चिमूर ३३

वरोरा ११

कोरपना ६१

जिवती ०४

इतर १८

Web Title: The second wave of Corona infection is coming down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.