काजलच्या मृत्यूचे रहस्य गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 12:01 AM2017-11-24T00:01:46+5:302017-11-24T00:02:59+5:30

येथील काजल रावजी हनवते या १७ वर्षीय युवतीच्या संशयास्पद मृत्यूमागे हत्या की आत्महत्या, याचे रहस्य पोलिसांच्या लेखी कायम असले तरी तिच्या नातेवाईकांनी मात्र काजलला मारून विहिरीत टाकल्याचा आरोप..

The secret of mascara's death is dark | काजलच्या मृत्यूचे रहस्य गडद

काजलच्या मृत्यूचे रहस्य गडद

Next
ठळक मुद्देहत्या झाल्याचा वडिलांचा आरोप : तपासाच्या गतीवर संशय

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : येथील काजल रावजी हनवते या १७ वर्षीय युवतीच्या संशयास्पद मृत्यूमागे हत्या की आत्महत्या, याचे रहस्य पोलिसांच्या लेखी कायम असले तरी तिच्या नातेवाईकांनी मात्र काजलला मारून विहिरीत टाकल्याचा आरोप ‘लोकमत’शी बोलताना केला. पोलिसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरविण्याची गरजही व्यक्त केली. यामुळे काजलच्या मृत्यूचे गुढ आणखी वाढले आहे.
काजल ही रविवारी पहाटे घरून बेपत्ता झाली. त्यानंतर बुधवारी म्हणजेच चार दिवसांनी एका विहिरीत तिचा मृतदेहच आढळला. मृतदेह २४ तासातील असल्याचा अंदाज ठाणेदार मल्लिकार्जून इंगळे यांनी व्यक्त केला होता. मग काजल बेपत्ता झाल्यापासून कुठे होती, असा प्रश्न उपस्थित होतो. काजलचे वडिल रावजी हनवते व मोठे वडिल काशिनाथ हनवते यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात पोलिसांना जे काही सांगत होतो. तेव्हा त्यांनी याची आवश्यकता नाही. जेव्हा पोस्टमार्टम रिपोर्ट येईल. तेव्हा पुढील तपास करण्याचे उत्तर मिळाले. पोलिसांनी प्राथमिक विचारपूस करणे आवश्यक होते, असेही ते म्हणाले. या प्रकरणाच्या तपासावर संशय व्यक्त करताना ते म्हणाले, काजलची आत्महत्या नसून तिला मारून विहिरीत टाकले आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. यामुळे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. पोस्टमार्टम अहवालात काजलचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र तिची हत्या वा आत्महत्या याचा उलगडा अद्याप झालेला नाही. काजलच्या वडिलाने केलेले आरोप पोलीस निरीक्षक मल्लिकार्जून इंगळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना फेटाळले. या प्रकरणातील प्रत्येक बाबींची चौकशी सुरू आहे. तपासात सत्य पुढे येईल, असेही ते म्हणाले.

Web Title: The secret of mascara's death is dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून