सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगातून निघाले अंकुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:32 AM2021-09-24T04:32:37+5:302021-09-24T04:32:37+5:30

आशिष खाडे पळसगाव : बल्लारपूर तालुक्यात पळसगाव, आमडी, कळमना, कोठारी, कवडजी, किन्ही, मानोरा, लावारी, दहेली या गावांमध्ये मागील वर्षी ...

Seedlings sprouted from soybean pods due to continuous rains | सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगातून निघाले अंकुर

सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगातून निघाले अंकुर

Next

आशिष खाडे

पळसगाव : बल्लारपूर तालुक्यात पळसगाव, आमडी, कळमना, कोठारी, कवडजी, किन्ही, मानोरा, लावारी, दहेली या गावांमध्ये मागील वर्षी कापसामुळे उत्पन्नात घट आल्याने सोयाबीन या पिकाला प्राधान्य देण्यात आले आहे. पेरणीनंतर दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी झाल्यावर निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकावर सतत पावसाचा शिरकाव होत आहे. सध्या पीक कापणीला आले असून, सतत पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीनच्या शेंगातील सोयाबीनच्या दाण्याला अंकुर आले आहे.

शेतामध्ये गेल्यावर सोयाबीनच्या शेंगातील दाण्याला नवीन अंकुर बघून शेतकरी पूर्णतः कोसळून गेला आहे. दाण्यामध्ये अंकुर दिसल्याने सोयाबीन कसे निघेल आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेत बळीराजा आहे.

जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने बळीराजाने एका एकरासाठी सोयाबीन तीन हजार सहाशे रुपये बॅग, खत एक हजार ३०० रुपये, मशागत दोन हजार रुपये, पेरणीसाठी मजुरी खर्च तीन हजार रुपये इतका केला आहे. पेरणीनंतर रोपटे वर आल्यावर १५ दिवसांनी त्याला डवरणी, खुरपनी, २२ दिवसांच्या आत खोडकीडा, चक्रीभुंगासाठी कीटकनाशक फवारणी, फुलोरावस्थेत उत्तपणात वाढ व्हावी म्हणून दुसरी फवारणी, आणि दाना भरताच कीड नियंत्रणाची तिसरी फवारणी अशी एकूण पाच-सहा हजार रुपयांची महागडी औषधाचा शिरकाव केला आहे.

मात्र आता सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगांना बिजांकुर पूर्ण शेतात दिसत असल्याने शेतकरी धास्तावले आहे. सोयाबीनचा एकही दाणा आजच्या घडीला पदरात पडणार की नाही या चिंतेत शेतकरी आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन पंचनामा करून योग्य तो मोबदला देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

]

230921\img20210922073813.jpg~230921\img20210922073840.jpg

caption~caption

Web Title: Seedlings sprouted from soybean pods due to continuous rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.