शेतातील कापूस बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 05:00 AM2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:27+5:30

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपायला तयार नाही. कधी निसर्गाची उदासीनता तर कधी शासनाचे शेतकरी विरोधी धोरण कास्तकारांना मारक ठरले आहे. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. शेतकरी दिवसेंदिवस महागाईच्या तडाख्यात भरडला जात आहे. नापिकिने शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.

Seeing the cotton in the field, the water in the eyes of the farmers | शेतातील कापूस बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

शेतातील कापूस बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Next
ठळक मुद्देकापूस वेचणीला मजूर मिळेना : वातावरणातील बदलाने शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : कापूस अंतिम टप्प्यात आला आहे. मार्च महिन्याचा पंधरवडा उलटून गेला आहे. मात्र कापूस वेचणीला मजूर मिळत नसल्याने कापूस शेतातच आहे. दररोज वातावरणात बदल होत असून वेळी-अवेळी पाणी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून शेतातील कापसू बघून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा संपायला तयार नाही. कधी निसर्गाची उदासीनता तर कधी शासनाचे शेतकरी विरोधी धोरण कास्तकारांना मारक ठरले आहे. उत्पादन खर्च जास्त व उत्पादन कमी अशी शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे. शेतकरी दिवसेंदिवस महागाईच्या तडाख्यात भरडला जात आहे. नापिकिने शेतकºयांवर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. मार्च महिन्याचा पंधरवडा संपायला आला आहे. कापूस वेचणी अंतिम टप्प्यात आली आहे. गहू, चना, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांना कापूस वेचणी करायला मजूर मिळणे कठीण झाले आहे.
वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने अवकाळी पाऊस होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. अवकाळी पावसासह गारपीठ झाली तर शेतकऱ्यांचा हाताशी आलेला कापूस मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. राजुरा तालुक्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
या स्थितीत शेतकरी आर्थिक नुकसानीचा धोका पत्करत कापूस वेचणीचे दर वाढवून १५ रुपये प्रति किलो दर द्यायला तयार आहेत. मात्र मजूर मिळत नसल्याचे पीक शेतातच आहे. परिणामी शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे.

कापसाची शेती संकटात
कापूस पिकावर होणारा खर्च मोठा आहे. सुरवातीपासून शेतकऱ्यांना कापूस पिकांवर जास्त खर्च करावा लागतो.त्या तुलनेत कापूस शेतकऱ्यांना परवडत नाही. मजुरांची मजुरी वाढल्याने कपसाचीं शेती संकटात आली आहे.

कापूस वेचणी शेवटच्या टप्प्यात आली असून कापूस वेचणी करायला मजूर मिळत नसल्याने नाईलाजाने जास्त पैसे मजुरी देऊन कापूस वेचणी करावी लागत आहे.
- श्रीधर जुनघरी, शेतकरी, गोवरी

Web Title: Seeing the cotton in the field, the water in the eyes of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती