अवैधरीेत्या जंगलातून फर्निचरसाठी आणलेले सागवान जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:59 AM2021-09-02T04:59:43+5:302021-09-02T04:59:43+5:30

राजुरा : मध्य चांदा वन विभागाच्या संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाने कोरपना उपवनक्षेत्रातील काही लोकांकडे जाऊन तपासणी केली ...

Seized teak illegally brought from the forest for furniture | अवैधरीेत्या जंगलातून फर्निचरसाठी आणलेले सागवान जप्त

अवैधरीेत्या जंगलातून फर्निचरसाठी आणलेले सागवान जप्त

Next

राजुरा : मध्य चांदा वन विभागाच्या संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाने कोरपना उपवनक्षेत्रातील काही लोकांकडे जाऊन तपासणी केली असता घरगुती सामान बनविण्यासाठी अवैधरीत्या जंगलातून आणलेले सागवान लाकडे आढळून आली. याप्रकरणी जप्तीची कारवाई करून वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सागवान लाकडाची सुमारे ५० हजार ७४० रुपये किंमत असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

राजुरा येथील संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन या भरारी पथकाचे वन परिक्षेत्र अधिकारी विनायक नरखेडकर यांनी अधिनस्त वन कर्मचारी यांना घेऊन वनसडी वनपरिक्षेत्राच्या कोरपना उपक्षेत्रातील मांडवा येथील सुरेश गणपत क्षीरसागर याच्या घरी धाड टाकली. यामध्ये सोफासेटची लाकडे, दिवाण पलंगचे चिरान लाकडे अशी एकूण २४ हजार ५५५ रुपये किमतीची १०९ नग लाकडे अवैधरीत्या आढळून आली. हे लाकडी सामान जप्त करून सुरेश क्षीरसागर याच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत सावलहिरा नियतवन क्षेत्रातील सावलहिरा येथील दिवाकर हंसकर व मारोती हंसकर यांच्या घरी धाड टाकली असता दोन्ही घरातून फर्निचरसाठी अवैधरीत्या आणलेली सागवान प्रजातीची २५ हजार १८५ रुपये किमतीची १०४ नग लाकडे जप्त करण्यात आली. दिवाकर हंसकर व मारोती हंसकर यांच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैधरीत्या सागवान झाडाची तोड करून फर्निचर तयार करणाऱ्या तस्कराचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई उपवन संरक्षक अरविंद मुंढे, दक्षता विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पथकप्रमुख वन परिक्षेत्र अधिकारी विनायक नरखेडकर, वनपाल विकास शिंदे, वनपाल अशोक नंदगिरीवार, वनरक्षक सीमा तुराणकर, गणेश बनकर यांनी केली आहे.

310821\img-20210831-wa0243.jpg

फोटो

Web Title: Seized teak illegally brought from the forest for furniture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.