सिनेस्टाईल पाठलाग करुन दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 05:00 AM2020-07-29T05:00:00+5:302020-07-29T05:01:00+5:30
पवनीकडून येणाऱ्या वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर तोरगाव टी पार्इंटजवळ एमएच ३२ सीएन ०५५६ या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन वाहनातून दोन लाख रुपये किंमतीची विदेशी दारु, दोन मोबाईल, तसेच एमएच ३१ सीएन १९१५ या वाहनातून २८ हजार ८०० रुपये किंमतीची दारु जप्त करुन तिघांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : पोलिसांनी चारचाकी वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन देशी विदेशी दारुसाठा जप्त केला. तसेच दुचाकीवाहनधारकांची तपासणी एकूण १२ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी केलेल्या या कारवाईत तीन महिलेसह चार जणांना अटक केली आहे. आदित्य वैरागडे (१९), अवतारसिंग दुधानी (३१), बंडू मनीराम शेंडे (३५), धिरज आंनदराव दिघोरे (३३) यांच्यासह तीन महिलांना अटक केली आहे.
ब्रह्मपुरी पोलिसांनी ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकांद्वारे दारुविक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम सुरु केली आहे. त्यानुसार पवनीकडून येणाऱ्या वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर तोरगाव टी पार्इंटजवळ एमएच ३२ सीएन ०५५६ या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करुन वाहनातून दोन लाख रुपये किंमतीची विदेशी दारु, दोन मोबाईल, तसेच एमएच ३१ सीएन १९१५ या वाहनातून २८ हजार ८०० रुपये किंमतीची दारु जप्त करुन तिघांना अटक केली. तर दुसऱ्या कारवाईत एमएच ३४ एटी ५०६९ व एमएच ३१ बीटी ८६६१ या दोन दुचाकीची तपासणी करुन दारुसाठ्यासह तीन महिला व एकाला अटक केली. दोन्ही कारवाई सुमारे १२ लाख ३० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार खोब्रागडे, नापोशी हेमके, नापोशी राँय, नापोशि शुभांगी, पोशि प्रिती, पोशि शिवनकर, कटाईत, भगत आदींनी केली.
वरोऱ्यात दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
नागरी रेल्वे गेटकडून माढेळीकडे एका कारमधून दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर नागरी ते माढेळी रोडवर नाकाबंदी केले. दरम्यान एमएच ३२ सी ४७८० संशयित वाहन येताच पोलिसांनी हात दाखवला. वाहनचालकाने वाहन न थांबवता पळ काढून काही अंतरावर गेल्यानंतर माढेळीजवळ गाडी ठेवून पसार झाला. पोलिसांनी दारु व वाहन असा एकूण १० लाखांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.
सिंदेवाहीत १८.५ लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांची चमू गस्त घालत असताना राजोली मार्गे पेटगावकडे एक ट्रक संयशास्पद जाताना दिसला. पोलिसांनी त्याला हात दाखविला मात्र ट्रकचालकाने ट्रक वेगाने पळविला. सरडपारजवळ ट्रक थांबवून वाहनचालकाने पळ काढला. पोलिसांनी पंचसमक्ष एम एच ३१ सीबी ३६७७ वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनात ३३ नग खर्ड्याच्या खोक्यात १५८४ नग विदेशी दारु, २९ खर्ड्याच्या खोक्यात २९०० नग देशी दारु, सात चुंगड्यामध्ये बांधलेली दारु, तसेच २०० नग टिनाचे पिपे असा एकूण १८ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार देवानंद सोनुले, पोलीस शिपाई राहुल यांच्यासह सिंदेवाही पोलिसांनी केली.