साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 10:22 PM2019-02-10T22:22:06+5:302019-02-10T22:22:27+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मूल रोड एम. ई. एल परिसरात नाकाबंदी करुन दोन वाहनासह १० लाख ८५ हजार रुपयांचा देशी विदेशी दारुचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एकला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मूल रोड एम. ई. एल परिसरात नाकाबंदी करुन दोन वाहनासह १० लाख ८५ हजार रुपयांचा देशी विदेशी दारुचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एकला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक मुंबई व भरारी पथक चंद्रपूर यांना नागभीडकडून दोन वाहने अवैध दारू घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर चंद्रपूर-मूल रोड वनविभागाच्या नाक्याजवळ एमईएल परिसर येथे नाकाबंदी करुन स्कॉर्पिओ व रिट्स वाहनाची तपासणी केली. दोन्ही वाहनांची दारुबंदी कायद्याअंतर्गत झडती घेतली असता, देशी दारूचे ७५ बॉक्स व रिट्ज वाहनामध्ये एकूण २५ बॉक्स असा एकूण १०० बॉक्समध्ये १० लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आढळून आला. पोलिसांनी सर्व दारुसाठा व दोन्ही वाहन जप्त केले. याप्रकरणी एका वाहनचालकास अटक करण्यात आली. तर एक वाहनचालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अंमलबजावणी व दक्षता संचालक सुनील चव्हाण यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक निरीक्षक पी. बी.सास्तुरकर, दुय्यम निरीक्षक ए. डब्ल्यू. क्षीरसागर, वाडेकर, पेदूजवार, पवार, दळवी, चव्हाण, मस्के आदींनी केले.