जमिनीनुसार कापूस बियाणे निवडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:53 AM2019-05-30T00:53:13+5:302019-05-30T00:53:31+5:30
मागील काही वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेमध्ये पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बहुतांश शेतकरी जमिनीचा पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेल तेच बियाणे निवडावे, असे कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील काही वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेमध्ये पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बहुतांश शेतकरी जमिनीचा पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेल तेच बियाणे निवडावे, असे कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
कोणतेही पीक घेण्यासाठी माती परिक्षणाचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. ज्या जमिनीवर पीक घ्यायचे त्यामध्ये नत्र आणि स्फूरदचे प्रमाण कसे आहे, हे तपासले पाहिजे. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण समजून घेण्यासाठी शेतकºयांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
कापूस पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात शोषली जातात. कापूस लागवड मध्यम खोल व उथळ जमिनीत करावी जमिनीच्या प्रकारानुसार कापूस बियाण्याची निवड केल्यास उत्पन्नात वाढ होईल, असे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले.
खतांचे प्रमाण योग्य ठेवावे
कापूस पिकाला रासायनिक खते स्फूरद व पालाश खताची अर्धी मात्रा उगवण झाल्यानंतर नत्रयुक्त खतांची अर्धा मात्रा दिल्यास पीक चांगले वाढते. रोप उगवण झाल्यानंतर नत्राची मात्रा देताना अनुभवी शेतकºयांकडून माहिती द्यावी.
लागवडीप्रसंगी नत्रयुक्त खते दिल्याने रोप उगवून येईपर्यंत त्यातील बरचेसे नत्र वाया जाते. पिकाला फारसा उपयोग होत नाही. स्फुरद व पालाश व नत्रयुक्त खतांची गरज असली तरी प्रमाणापेक्षा अधिक नको.
उगवणीपूर्वीचे तणनियंत्रण करणे आवश्यक
कोरडवाहू वाण लागवडीपूर्वी शेतातील तणांचे निरीक्षण करावे, रोप उगवणीपूर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन सुरुवातीच्या काळातच तण नियंत्रण करणे गरजेचे आहे.
कोरडवाहूचे शेतकरी पूर्णत: पावसावर अवलंबून असतात. पेरणीनंतर पाऊस लागून राहिल्यास बरेच दिवस कापूस पिकाच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात.
उगवणीपूर्वी वापरण्यासाठी तणनाशक अहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी व पेरणीच्या ७ ते १० दिवसाआधी वापरता येते.
लागवडीसाठी घ्यावयाची काळजी
कापूस पिकाची लागवड प्रामुख्याने कोरडवाहू लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. काही शेतकरी बागायती लागवड करतात. या काळातील तापमानात बरीच तफावत राहते. पावसाच्या पाण्यावर होणारी लागवड ही बहुतांशपणे कमी उत्पन्न व पिकांची कमी वाढ या दोन समस्येने ग्रस्त असते.
कोरडवाहू लागवडीच्या कापसाची वाढ ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. कृषी विद्यापीठांनी अशा भागासाठी कापूस बियाणाची नवीन जात विकसीत केली पाहिजे. कोरडवाहू कापासापासून उत्पादन मिळविण्यासाठी शेतकºयांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
कमी पावसाता येऊ शकेल अशाच वाणांचा कालावधी हा कमी ते मध्यम दिवसाचा असावा, जेणेकरुन चांगला पाऊस राहिल्यास त्या काळात कापसाला फुले येऊन जमिनीत असलेल्या ओलाव्यावर कापूस बोंडाची पक्चता मिळेल. अधिक कालावधीचे वाण लावल्यास त्यापासून उत्पादन मिळत नाही.