११ ग्रामपंचायतीच्या करभाऱ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:29 AM2021-02-16T04:29:56+5:302021-02-16T04:29:56+5:30
आतापर्यंत एकूण ७० ग्रामपंचायतींपैकी ५५ ग्रामपंचायत करभाऱ्यांची निवड करण्यात आली असून, बाकीच्या १५ ग्रामपंचायत करभाऱ्यांची निवड शिल्लक ...
आतापर्यंत एकूण ७० ग्रामपंचायतींपैकी ५५ ग्रामपंचायत करभाऱ्यांची निवड करण्यात आली असून, बाकीच्या १५ ग्रामपंचायत करभाऱ्यांची निवड शिल्लक आहे.
सोमवारी तालुक्यात खालीलप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच निवडण्यात आली. त्यापैकी
वायगाव या ग्रामपंचायतच्या सरपंचपदी गुरुदेव तुपट, तर उपसरपंच म्हणून चक्रधर ढोक,
चोरटी-सरपंच निशा मडावी, उपसरपंच सुधाकर कांबळी,
रामपुरी- सरपंच रेवती ठाकूर, उपसरपंच सचिन मेश्राम, मांगली- सरपंच उषा बनकर, उपसरपंच भावेश दोनाडकर,
मुई-सरपंच उमेश घुले, उपसरपंच देवराव नन्नावरे, निलज- सरपंच पुंडलिक ठाकरे, उपसरपंच शंकर कोपुलवार, रुई-सरपंच कल्पना तुपट, उपसरपंच ज्ञानेश्वर बुल्ले, पाचगाव- सरपंच मुकुंदा शिवुरकार, उपसरपंच दिवाकर शिवुरकार, गोगाव- सरपंच जयश्री दोडके, उपसरपंच जितेंद्र भजगवळी, तळोधी खुर्द- सरपंच अनिल तिजारे, उपसरपंच संजय मारबते, बरडकिन्ही- सरपंच मनोज बन्सोड, उपसरपंच भास्कर गोटेफोडे,
अशा रीतीने ११ ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडण्यात आले.