दुचाकीने भाजीपाला विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:30 AM2021-05-11T04:30:03+5:302021-05-11T04:30:03+5:30

दुग्ध व्यावसायिकांना फटका चंद्रपूर : कोरोनामुळे सर्वच हाॅटेल, रेस्टाॅरंट बंद आहे. त्यामुळे दूध व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. जमा ...

Selling vegetables by bike | दुचाकीने भाजीपाला विक्री

दुचाकीने भाजीपाला विक्री

Next

दुग्ध व्यावसायिकांना फटका

चंद्रपूर : कोरोनामुळे सर्वच हाॅटेल, रेस्टाॅरंट बंद आहे. त्यामुळे दूध व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. जमा झालेल्या दुधापासून सध्या खवा तसेच इतर पदार्थ तयार करण्याकडे ते वळले असून, नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गावागावात कोरोनाची दहशत

चंद्रपूर : मागील वर्षी कोरोना रुग्ण जास्तीत जास्त संख्येने शहरात आढळत होते. यावेळी मात्र गावागावात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यातच गावातील मृत्यूदरही जास्त आहे. त्यामुळे नागरिक दहशतीत आहेत. विशेष म्हणजे, काही गावातील नागरिक शहरातील शासकीय रुग्णालयात येण्यास घाबरत असल्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे.

शेतीची कामे सुरू

चंद्रपूर : शेती हंगामाला आता काही दिवसच राहिल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. शेतीतील काडीकचरा काढण्याचे काम जोमात सुरू आहे. त्याचसोबत बँकेतील पीक कर्जांसाठीही कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहेत.

खासगी शिक्षक पुन्हा संकटात

चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकट घोंगावत आहे. त्यामुळे शाळाही सुरू झाल्या नाही. त्यातच आता पुन्हा कोरोना संकटाने तोंड वर काढल्यामुळे काॅन्व्हेंट शिक्षकांचा ताप वाढला आहे. मागील वर्षी काही संचालकांनी या शिक्षकांना काही प्रमाणात वेतन दिले. मात्र काहींनी दमडीही दिली नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.

पेट्रोल पंपवरील सेवा सुरू कराव्या

चंद्रपूर : लाॅकडाऊन असल्यामुळे बाजारपेठ बंद आहे. मात्र वाहतुकीला सूट देण्यात आल्यामुळे कामानिमित्त नागरिक बाहेर पडत आहेत. मात्र वाहनांच्या चाकामध्ये हवा भरण्यासाठी दुकानेच सुरू राहत नसल्यामुळे अशा वाहनधारकांची मोठी फजिती होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपावरील वाहनात हवा भरून देण्याबाबत प्रशासनाने सक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

चंद्रपूर : शेती हंगाम काही दिवसावर आला असला तरी बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची काही प्रमाणात लगबग बघायला मिळत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी आहेत. त्यामुळे हंगामापूर्वीच बियाणे घेऊन तपासणी करण्यासाठी शेतकरी आतापासूनच बियाणे खरेदीकडे वळले आहेत. विशेष म्हणजे, बोगस बियाण्यांपासून सावध राहण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

अनियमित पाणी पुरवठा

चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डामध्ये अनियमित पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटामध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पाणी पुरवठा नियमित करावा, अशी मागणी केली जात आहे.

बांधकाम मजूर पुन्हा अडचणीत

चंद्रपूर: मागील वर्षी कोरोनामुळे अन्य राज्यातील बांधकाम मजूर आपल्या राज्यात गेले होते. दरम्यान ते पुन्हा परतले. मात्र आता लाॅकडाऊन सुरू झाल्यामुळे त्यांच्या हाताला काम नाही. त्यातच शासनाने जाहीर केलेल्या योजनेमध्ये त्यांच्या नावाची नोंदच नसल्यामुळे त्यांना वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे मजूर पुन्हा आपल्या गावाकडे जाण्याच्या तयारीला लागले आहे.

मशागतीचे भाव वाढले

चंद्रपूर : यावर्षी पेट्रोल तसेच डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे ट्रॅक्टर व्यावसायिकांनी शेती मशागतीचेही भाव वाढविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे पेट्रोल तसेच डिझेलचे भाव कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळ

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे. अनेकांच्या रजाही रद्द झाल्या आहेत.

शाळांमध्ये पुस्तक पुरवठा करावा

चंद्रपूर : शासनातर्फे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून केंद्रापर्यंतच पुस्तक पुरवठा केला जात असल्याने शिक्षकांना अतिरिक्त पैसे मोजून शाळेपर्यंत पुस्तके न्यावी लागतात.

थंडपेय व्यावसायिक अडचणीत

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यामुळे यावर्षीही सलग दुसऱ्यांदा थंडपेय व्यावसायिक अडचणीत आले आहेत. अनेकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केला आहे.

Web Title: Selling vegetables by bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.