गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोककल्याणाचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा!

By admin | Published: September 13, 2016 12:43 AM2016-09-13T00:43:20+5:302016-09-13T00:43:20+5:30

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ब्रिटीश सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली.

Send a message of public welfare to the masses through Ganeshotsav! | गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोककल्याणाचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा!

गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोककल्याणाचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा!

Next

सुधीर मुनगंटीवार : चंद्रपुरातील विविध गणेश मंडळांना दिल्या भेटी
चंद्रपूर : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ब्रिटीश सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सार्वजनिक गणेशोत्सवाने या प्रदीर्घ कालावधीत अनेक स्थित्यंतरे बघितली. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, ही सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली आणि समाजमन चेतविले. टिळकांच्या या सिंहगर्जनेला शंभर वर्षे यावर्षी पूर्ण झालीत. त्यानिमीत्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून लोकमान्य महोत्सव साजरा करण्याचा संकल्प यावर्षी अर्थसंकल्प मांडताना आपण जाहीर केला आहे. त्यानुसार शासनातर्फे लोकमान्य महोत्सव राज्यभर साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजसेवेचा, लोककल्याणाचा संदेश आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवावा, असे आवाहन वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
रविवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरातील चंद्रपूरचे वैभव गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. पाणी बचाव या संकल्पनेवर आधारित शाळेचे मॉडेल, चंद्रपूरातील जुन्या तसेच नविन छायाचित्रांची प्रदर्शनी, वनऔषधी प्रदर्शन, बांबु प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच स्वराज्य से सुराज्य तक या विषयावरील चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. रविंद्र भागवत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, डॉ. गोपाल मुंदडा, डॉ. किशोर धांडे, डॉ. मंगेश गुलवाडे, काबरा, डॉ. सुशील मुंदडा, धाबेकर, मधुसुदन रूंगठा, प्रकाश धारणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यानंतर गिरनार चौकातील जय बजरंग गणेश मंडळ, जटपुरा येथील प्रसिध्द चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ, अथर्व गणेश मंडळ, भानापेठ वॉर्डातील माता रेणुका गणेश मंडळ, बंगाली कॅम्प येथील गणेश मंडळ, गंज वॉर्डातील न्यु इंडिया गणेश मंडळ या मंडळांना ना. मुनगंटीवार यांनी भेटी दिल्या. यावेळी दीपक बेले, राहूल पावडे, सुभाष कासनगोटटूवार, चंदू पाठक, मनोज पाल, रमेश तिवारी, संदीप आवारी आदींची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Send a message of public welfare to the masses through Ganeshotsav!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.