वरिष्ठ रोखपालांचा बळी घेणारा गजराज ताडोबात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 12:07 PM2021-05-07T12:07:06+5:302021-05-07T12:07:43+5:30

Chandrapur news वरिष्ठ रोखपाल प्रमोद गौरकार यांचा बळी घेणारा गजराज शुक्रवारी पहाटे ताडोबातच जेरबंद करण्यात आला. रात्रभराच्या प्रयत्नानंतर पहाटे पाच वाजता त्याला पकडण्यात आले.

Senior cashier's victim Gajraj arrested in Tadoba | वरिष्ठ रोखपालांचा बळी घेणारा गजराज ताडोबात जेरबंद

वरिष्ठ रोखपालांचा बळी घेणारा गजराज ताडोबात जेरबंद

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: वरिष्ठ रोखपाल प्रमोद गौरकार यांचा बळी घेणारा गजराज शुक्रवारी पहाटे ताडोबातच जेरबंद करण्यात आला. रात्रभराच्या प्रयत्नानंतर पहाटे पाच वाजता त्याला पकडण्यात आले.

काय होती घटना?

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी परिसरात हत्तीच्या हल्ल्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ रोखपाल प्रमोद गौरकार हे जागीच ठार झाले होते. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. मात्र ताडोबा व्यवस्थापनाने रात्री उशिरा या घटनेवर शिक्कामोर्तब केले. 
हल्ला करणारा हत्ती हा गजराज होता. यापूर्वी गजराजने माउताला ठार केले होते. लॉकडाऊनमुळे ताडोबातील हत्ती हे बोटेझरी येथे रवाना केले आहे. अशातच ही घटना घडली. गजराज नावाचा हत्ती चौताळला असून त्याला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न सुरू आहे,अशी  माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी दिली. कोळसाचे एसीएफ कुळकर्णी यांच्यासोबत वरिष्ठ रोखपाल गौरकार हे ताडोबाच्या कोअर झोनमध्ये गेले होते. दरम्यान बोटेझरी परिसरात त्यांचे वाहन फसले. या परिसरात गजराज फिरत होता. अशातच गजराजने एसीएफ कुळकर्णी व वरिष्ठ रोखपाल गौरकार यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये गौरकार हे जागीच ठार झाले, असे ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. रामगावकर यांचे म्हणणे आहे.

घटनेवरून अनेक प्रश्न
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात रोखपाल यांचे कोणतेही काम नसते. त्यांना ताडोबात नेण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र ही घटना घडल्यानंतर एकूणच ताडोबा व्यवस्थापनाकडून याबाबत सावरसावर सुरू झाली असल्याचे दिसून येते. मात्र घटना घडली असल्याने ती लपविणे शक्य नसल्याने वेगळे कारण पुढे करण्यात आल्याची चर्चा ताडोबाच्या वर्तुळात सुरू आहे. ताडोबात कुठेही वाहन फसल्याचे आजवर ऐकिवात नाही. यावरून घटनेबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: Senior cashier's victim Gajraj arrested in Tadoba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.