भविष्यातील सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी चंद्रपूर सैनिकी शाळेचे असावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 03:15 PM2019-07-26T15:15:35+5:302019-07-26T15:18:51+5:30

ऑपरेशन विजय, अर्थात २६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्ध जिंकण्याचा दिवस. चंद्रपूर सैनिकी शाळेमध्ये शुक्रवारी देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात कारगिल दिवस साजरा करण्यात आला.

The senior officers of the future army should belong to Chandrapur Military School | भविष्यातील सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी चंद्रपूर सैनिकी शाळेचे असावेत

भविष्यातील सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी चंद्रपूर सैनिकी शाळेचे असावेत

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रपूर सैनिकी शाळेत लेफ्टनंट जनरल निंभोरकरांच्या उपस्थितीत कारगील दिन  सैनिकी शाळेचे प्रधानमंत्री,संरक्षणमंत्री करणार लवकरच उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
 चंद्रपूर : ऑपरेशन विजय, अर्थात २६ जुलै १९९९ रोजी कारगिल युद्ध जिंकण्याचा दिवस. चंद्रपूर सैनिकी शाळेमध्ये शुक्रवारी देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात कारगिल दिवस साजरा करण्यात आला. यावेळी या शाळेत दाखल झालेल्या सैनिकी पेहरावातील पहिल्या तुकडीला संबोधित करताना राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भविष्यामध्ये या शाळेचा विद्यार्थी आर्मी, नेव्ही किंवा एअर फोर्सचा प्रमुख व्हावा व त्याने गर्वाने चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचे नाव सांगावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
चंद्रपूरच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन लवकरच प्रधानमंत्री किंवा संरक्षण मंत्र्यांच्याहस्ते होणार आहे. मात्र सैनिकी शाळेच्या नियमानुसार या ठिकाणची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून ९० विद्यार्थ्यांची सहाव्या वर्गाची पहिली तुकडी अभ्यासक्रमाला लागली आहे. आज कारगिल विजय दिवसाच्या शुभ पर्वावर चंद्रपूर सैनिकी शाळेने देशभक्तीने ओतप्रोत  कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला सैनिकी शाळेसाठी प्रेरणास्थान ठरलेले सर्जिकल स्ट्राइक मधील मुख्य भूमिका असलेले लेफ्टनंट जनरल  राजेंद्र निंभोरकर आणि  राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत या कार्यक्रमाला लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, सीनियर एडमिन एअर स्टाफ आॅफिसर बी. मणिकंटन, वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, चंद्रपूर महानगरपालिकेच्या  महापौर  अंजलीताई घोटेकर,  विभागीय मुख्य अभियंता उल्हास देबडवार, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,  अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, समाज कल्याण सभापती  ब्रिजभूषण पाझारे,  बल्लारपूर नगरपरिषदेचे  नगराध्यक्ष  हरिष शर्मा, शिक्षणाधिकारी माध्यमिक संजय डोर्लीकर यांची देखील उपस्थिती होती.

Web Title: The senior officers of the future army should belong to Chandrapur Military School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.