सेवानिवृत्तीनिमित्त ज्येष्ठ व्हाॅलीबाॅल संघातर्फे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:53+5:302021-07-02T04:19:53+5:30

चंद्रपूर : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, चंद्रपूर येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले नरेंद्र कुंभारे हे सेवानिवृत्त झाले. या ...

Senior Volleyball Team felicitates on retirement | सेवानिवृत्तीनिमित्त ज्येष्ठ व्हाॅलीबाॅल संघातर्फे सत्कार

सेवानिवृत्तीनिमित्त ज्येष्ठ व्हाॅलीबाॅल संघातर्फे सत्कार

Next

चंद्रपूर : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, चंद्रपूर येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले नरेंद्र कुंभारे हे सेवानिवृत्त झाले. या निमित्त ज्येष्ठ व्हाॅलीबाॅल बहूद्देशीय संस्था चंद्रपूर व मित्रपरिवारातर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांचा संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप जानवे, प्रमुख पाहुणे म्हणून मनोहर पाऊनकर, परमिंदर उप्पल आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी रामस्वामी कापरबोईना, सिद्धार्थ वाघमारे, मनोहर पाऊनकर, परमिंदर उप्पल, प्रदीप जानवे यांनी नरेंद्र कुंभारे यांच्याविषयी गौरोद्गार काढले.

यावेळी ज्येष्ठ हाॅलीबाॅल बहूद्देशीय संस्था, चंद्रपूर व मित्रपरिवार यांच्यासोबत भविष्यातही जोडून राहील, असे आश्वासन नरेंद्र कुंभारे यांनी दिले. संचालन दीपक जेऊरकर, आभार प्रकाश सुर्वे यांनी केले. कार्यक्रमासाठी अरविंद पुरणकर, अमित दिकोंडवार, प्रवीण चवरे, सचिन भिलकर यांनी अथक परिश्रम घेतले.

Web Title: Senior Volleyball Team felicitates on retirement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.