ज्येष्ठांनो, ओमायक्रॉन रोखायचाय, बूस्टर सोडा, आधी पहिला डोस घ्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 05:00 AM2021-12-30T05:00:00+5:302021-12-30T05:00:40+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले. यामध्ये आता पाच टप्प्यात लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला केवळ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण करण्यात आले. काही कर्मचारी अजूनही लस घेतली नाही. त्यामुळे त्यांना बूस्टस डोस कसा द्यायचा हा प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा ठाकला. कोरोना प्रतिबंधक उपायांमध्ये लसीकरण ही सर्वात प्रभावी उपाययोजना असल्यामुळे आरोग्य यंत्रणेचा लसीकरणावर जास्त जोर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम सुरू असूनही जिल्ह्यातील १ लाख ५५५ हजार ज्येष्ठ नागरिकांनी अजूनही पहिला डोस घेतला नाही. ओमायक्राॅनमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्य प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले. यामध्ये आता पाच टप्प्यात लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला केवळ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण करण्यात आले. काही कर्मचारी अजूनही लस घेतली नाही. त्यामुळे त्यांना बूस्टस डोस कसा द्यायचा हा प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा ठाकला. कोरोना प्रतिबंधक उपायांमध्ये लसीकरण ही सर्वात प्रभावी उपाययोजना असल्यामुळे आरोग्य यंत्रणेचा लसीकरणावर जास्त जोर आहे.
१५ ते १८ वयोगटाचेही आता लसीकरण
जिल्ह्यात १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सध्या सुरू आहे. याशिवाय ३ जानेवारीपासून १५ ते १८ या वयोगटातील युवकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तशी घोषणा केंद्र शासनाद्वारे करण्यात आली. मात्र, लस कोणती देणार याविषयी अद्याप माहिती प्राप्त झाली नाही. लाभार्थी किती राहणार, याचा अंदाज बांधण्यात येत आहे.
५८.०५ टक्के लसीकरण
चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत ५८.०५ टक्के लसीकरण झाले. यामध्ये सर्वाधिक ६९.३९ टक्के लसीकरण वरोरा तालुक्यात तर सर्वात कमी ५२. ३४ टक्के बल्लारपूर तालुक्यात झाले आहे. कोविड लस घेण्यात तरूणाईची संख्या बरीच झाली आहे.